अमरावती : महानगरातील मोठ्या मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. त्यानुसार ६०० मालमत्तांचे प्रायोगिक तत्त्वावर मूल्यांकन करण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. यामध्ये आवासीय आणि व्यावासायिक इमारतींचा समावेश करण्यात आला आहे.महापालिका क्षेत्रात पाऊणेदोन लाखांच्या आसपास मालमत्ता असताना त्याप्रमाणात कराच्या स्वरुपात उत्पन्न प्राप्त होत नाही. एकिकडे उत्पन्नात वाढ होत नसताना खर्चात मात्र अधिक वाढ झाली आहे. एलबीटीचा भरणा करण्याची मानसिकता व्यापाऱ्यांनी कमी केल्यामुळे महापालिकेला याचा फटका बसत आहे. परिणामी खर्चात होत असलेली वाढ बघता उत्पन्नातही वाढ करण्याच्या अनुषंगाने उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार २८ आॅक्टोबरपासून शहरातील मोठ्या इमारतींचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. ज्या इमारती अस्तित्वात आहेत, त्या इमारतींचे बांधकाम परवानगी तपासली जाणार आहे. मंजुरीपेक्षा जास्त बांधकाम आढळल्यास सदर मालमत्ता धारकाकडून दंडात्मक वसुली केली जाईल. हा प्रयोग झोन क्रमांक १ अंतर्गत सुरु करण्यात आला असून या भागातील मोठ्या आणि नवीन इमारतींचे मूल्यांकन केले जाणार आहे. मोठ्या इमारतींचे सर्वेक्षण करताना या इमारतींचा वापर कशासाठी होत आहे, याचा डाटा तयार केला जाईल, असे झोन क्रमांक १ चे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी सांगितले. स्थापत्य कंसल्टन्सी कंपनीला मालमत्तांचे मूल्यांकन करण्याचा कंत्राट सोपविण्यात आला आहे. अमोल डोईफोडे हे तांत्रिक कंसल्टन्स या प्रक्रियेत तिसरा डोळा म्हणून काम बघणार आहेत. मालमत्तांचे मूल्यांकन होताना या मालमत्तांचे डाटा तयार केला जात आहे.आयुक्त अरुण डोंगरे यांच्या कल्पकतेतून उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने मोठ्या मालमत्तांचे सर्वेक्षण केले जात आहे. या प्रक्रियेतून आर्थिक उत्पन्नात वाढ होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. एलबीटीचे उत्पन्न माघारल्याने अन्य विभागातून उत्पन्नवाढीचे प्रयत्न प्रशासनाने सुरु केले आहे. याच श्रृखंलेत मालमत्तांचे सर्वेक्षण करुन नव्याने कर आकारणी होणार आहे. मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करावयास येणाऱ्या चमुला व्यावसायिकांनी ओळखपत्र दाखविल्यानंतर सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त अरुण डोंगरे यांनी केले आहे. या पथकात सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, अमोल डोईफोडे, सहायक क्षेत्रीय अधिकारी अलुडे, कर निरीक्षक चव्हाण, टापरे आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
आता शहरात मोठ्या मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन
By admin | Updated: November 1, 2014 01:28 IST
महानगरातील मोठ्या मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे.
आता शहरात मोठ्या मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}