शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मुदतीनंतरही नगरपंचायतीची अधिसूचना अप्राप्त

By admin | Updated: May 9, 2014 23:46 IST

जिल्ह्यामधील तिवसा, नांदगाव (खंडेश्वर), भातकुली व धारणी या तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायती ंऐवजी ‘क’ वर्ग नगरपंचायत करण्याचा निर्णय नगरविकास खात्याने घेतला आहे.

गजाननमोहोड - अमरावती

जिल्ह्यामधील तिवसा, नांदगाव (खंडेश्वर), भातकुली व धारणी या तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायती ंऐवजी ‘क’ वर्ग नगरपंचायत करण्याचा निर्णय नगरविकास खात्याने घेतला आहे. यासाठी १ मार्च २०१४ रोजी शासनाने अधिसूचना काढली. आक्षेप नोंदविण्याची अंतिम मुदत ३१ मार्च होती. प्रत्यक्षात ही अधिसूचना जारी झाल्याची कुठलीही सूचना जिल्हा प्रशासनाला नाही. मुदत संपल्यानंतर अधिसूचना अप्राप्त असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविला आहे. तालुक्याचे मुख्यालय असणार्‍या तिवसा, नांदगाव (खं.), भातकुली व धारणी या ठिकाणी ग्रामपंचायती आहेत. नगरपरिषदेसाठी असणार्‍या २५ हजार लोकसंख्येच्या निकषांमध्ये ही गावे मोडत नसल्याने शासनाने या ठिकाणी ‘क’ दर्जा असणारी नगरपंचायत तयार करण्याची घोषणा विधानसभेत केली. मंत्रिमंडळाचा ठराव पारित झाला. जिल्ह्यातील या नगरपंचायतींसाठी नगरविकास खात्याने १ मार्च २०१४ रोजी अधिसूचना (नोटीफिकेशन) जारी केली. यावर ३० दिवसांत म्हणजेच ३१ मार्च २०१४ पर्यंत हरकती व आक्षेप मागविले. प्रत्यक्षात ही अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयास अप्राप्त असल्याने जिल्हा प्रशासन अनभिज्ञ राहिले. त्यामुळे जिल्ह्यात नव्याने होणार्‍या या चार नगरपंचायती गलथान कारभारामुळे अधिसूचना प्रक्रियेपासून वंचित राहिल्या. राज्याच्या प्रधान सचिवांनी वस्तूनिष्ठ अहवाल मागविला असल्याची माहिती मिळाली आहे.