'गारमेंट झोन'साठी बांधकाम विभागाची एनओसी

By Admin | Updated: May 10, 2014 02:28 IST2014-05-10T01:16:32+5:302014-05-10T02:28:32+5:30

बडनेऱ्यातील विजय मिलच्या जागेवर टेक्सटाईल व गारमेंट पार्क झोनची निर्मिती करण्याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पारित केले आहे.

NOC of Construction Department for 'Garment Zone' | 'गारमेंट झोन'साठी बांधकाम विभागाची एनओसी

'गारमेंट झोन'साठी बांधकाम विभागाची एनओसी

बडनेरा : बडनेर्‍यातील विजय मिलच्या जागेवर टेक्सटाईल व गारमेंट पार्क झोनची निर्मिती करण्याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पारित केले आहे.
राज्य शासनाने बडनेर्‍यातील विजय मील बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर येथील विजय मिलच्या वास्तूला जमिनदोस्त करण्यात आले.रिकाम्या जागेवर टेक्सटाईल व गारमेंट पार्क झोन उभारण्याबाबतच्या प्रस्तावावर पत्र क्रमांक ४६१३/सं.क्र. ७१/ज-९ दि.२३एप्रिल २0१३रोजी महसूल व वनविभाग मुंबई यांनी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठविले होते.या पत्रानुसार गारमेंट झोनच्या निर्मितीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र, प्रचलित दरानुसार जमिनीचा भाडेपट्टय़ाबाबतचे पत्र प्रशासनाला प्राप्त झाले होते.स्वाभीमान कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष विजय वाडेकर व सिद्धार्थ बनसोड यांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला.

Web Title: NOC of Construction Department for 'Garment Zone'