शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विविध योजनांसाठी आधार कार्ड आवश्यक नाही

By admin | Updated: October 29, 2015 00:38 IST

केंद्र शासनाच्या आधार कार्ड योजनेबाबत सन २०१२ मध्ये दाखल रिट याचिका (सिव्हिल) क्र. ४९४ व इतर प्रकरणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने ११ आॅगस्ट २०१५रोजी दिलेल्या आदेशाची....

जिल्हाधिकारी : न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याच्या सूचनाअमरावती : केंद्र शासनाच्या आधार कार्ड योजनेबाबत सन २०१२ मध्ये दाखल रिट याचिका (सिव्हिल) क्र. ४९४ व इतर प्रकरणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने ११ आॅगस्ट २०१५रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिल्या आहेत. यानुसार नागरिकांना आधार कार्ड मिळविणे सक्तीचे नाही. सर्व प्रकारचे लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असण्याची अट आवश्यक नाही. कुठल्याही सार्वजनिक वितरण योजनेचा लाभ घेण्याकरिता वा इतर कामांसाठी आधार कार्डचा वापर करु नये. विशेषत: अन्नधान्न वितरण, अन्न शिजवण्यासाठी आवश्यक इंधन पुरवठा तसेच एलपीजी गॅस वितरण आदी कामांसाठी आधार कार्डचा वापर करावा, असे यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार गुन्हेगारी प्रकरणांच्या अन्वेषणांव्यतिरिक्त इतर कामांच्या अनुषंगाने आधार कार्डसाठी गोळा करण्यात आलेली नागरिकांची वैयक्तिक माहिती वापरली जाऊ नये. या अनुषंगाने केंद्र शासनाच्या उपरोक्त आदेशाचे तत्काळ पालन करावे. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाच्या अनुषंगाने यापूर्वी याप्रकरणी दिलेल्या सर्व सूचना रद्द समजाव्यात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. नरेगा आयुक्त कार्यालयाने केंद्र शासनाकडे विनंती करुन राज्यस्तरावर ‘यूआयडी एक्सपर्ट’ सुविधा करुन घेतलेली आहे. तसेच १५ एप्रिल २०१५ रोजीच्या परिपत्रकान्वये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या कामाच्या मागणीसोबत यूआयडी/ईआयडी क्रमांकाची नोंद अथवा त्यापासुन सूट मिळविण्याच्या कार्यपध्दतीबाबत सूचना दिल्या आहेत. शासनस्तरावरुन आधार कार्डसोबत कुठल्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नाही.