शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला ५१ लाखांचा फटका !

By admin | Updated: May 3, 2016 00:16 IST

सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात झालेल्या सदोष समायोजनाने महानगरपालिकेला तब्बल ५० लाख ८७ हजार १५८ रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

शिक्षण उपसंचालकांकडून खर्च अमान्य : सदोष समायोेजनअमरावती : सन २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात झालेल्या सदोष समायोजनाने महानगरपालिकेला तब्बल ५० लाख ८७ हजार १५८ रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. शिक्षकांच्या चुकीच्या समायोजनावर शिक्षण उपसंचालक एस.बी कुळकर्णी यांनी ठपका ठेवला आहे. तथा ती मोठी रक्कम अमान्य केली आहे. सदर प्रकरण महापालिका आयुक्तांच्या दालनात पोहोचल्यावर त्यांनी ही रक्कम त्या कालावधीत कार्यरत असलेल्या संबंधितांकडून वसूल करण्याचे आदेश अधिनस्थांना दिलेत.शासनाच्या संच मान्यतेनुसार मंजूर पदांचे वेतन व भत्ते दिले जातात. वेतन अनुदानापैकी ५० टक्के रक्कम शिक्षण उपसंचालक स्तरावरून तर ५० टक्के रक्कम महापालिकेला द्यावी लागते. सन २०१४-१५ या वर्षात महापालिकेतील शिक्षण विभागाने सदोष समायोजन केले व त्यापोटी ५० लाख ८७ हजार १५८ रुपये खर्च केले. पदे रिक्त नसल्याने वेतन व भत्ते मान्य करता येणार नाही, असा शेरा शिक्षण उपसंचालकांनी मारल्याने महापालिकेला भुर्दंड सहन करावा लागला. महापालिका ही रक्कम संबंधित शिक्षकांना देवून चुकली आहे. ती रक्कम शिक्षण उपसंचालकांनी अमान्य केल्याने लिपिक, अधीक्षक, शिक्षणाधिकाऱ्यांसह लेखविभागाकडून ही रक्कम वसूल केली जाईल. अमान्य केलेली रक्कम अमान्य करण्याची कारणे१,७०,०४८ रु.श्रीमती अस्मा परविन शौकत उल्लाखान यांना महापालिकेत पद रिक्त नसताना समायोजित केल्यामुळे त्यांना देय्य असलेले व भविष्यात दिले जाणारे वेतन व भत्ते मान्य करता येणार नाही.४,११,७६४ रु.शबानाबानो इबादुल्ला खान यांना पंचायत समिती चांदूरबाजार येथून बदलीने रुजू करुन घेतले आहे. सदर नगर परिषदेमध्ये पद रिक्त नसल्यामुळे त्यांना देय असलेले व भविष्यात दिल्या जाणारे वेतन व भत्ते मान्य करता येणार नाही.६३,२०९ रु.मो.साबीर शेख बिसमिल्ला यांची भिवंडी निझामपूर येथून आंतर जिल्हा बदलीने मनपा मध्ये जागा नसतांना रुजू करुन घेतल्यामुळे त्यांना देय व भविष्यात दिल्या जाणारे वेतन व भत्ते मान्य करता येणार नाही.९,८४,९७९ रु.वर्षा दिपक पिंजरकर व मनिषा बदुकले यांना मराठी माध्यमामध्ये पद रिक्त नसतांना व अतिरिक्त शिक्षक असतांना रुजू करुन घेतल्यामुळे त्यांना दिलेले वेतन व भविष्यात देय असलेले वेतन अनुदानास पात्र ठरणार नाही१०,३३,१४३ रु.मराठी माध्यमाचे अतिरिक्त शिक्षक असतांना नाहरकत प्रमाणपत्र देऊन दोन शिक्षकांना रुजू करुन घेण्यात आले. तसेच सेवाजेष्ठतेनुसार १८ शिक्षण सेवक अतिरिक्त होत असतांना त्यांची माहिती दडवून ठेवली त्यातील सन २०१४-१५ च्या संच मान्यतेनुसार ९ शिक्षक अतिरिक्त ठरल्यामुळे त्यांचे वेतनावर झालेला खर्च अमान्य करण्यात येत आहे.२४,२४,०१५ रु. एचडीएफसी खाते क्रमांक ५०२००००३४१८५९१ मध्ये जमा करण्यात आलेली संपूर्ण रक्कम एक्सीस बॅकेत मनपा फंडात जमा करण्यात आली. तसेच वारंवार निर्देश देऊनही स्वतंत्र कॅशबुक न ठेवल्यामुळे सन २०१४-१५ मध्ये प्रत्यक्ष केलेल्या खर्चावर २ टक्के (राज्य शासनाचा हिस्सा १ टक्के) दंडात्मक कार्यवाही म्हणून कपात करण्यात येत आहे.वेतन आणि भत्यासंदर्भात अमान्य केलेल्या रक्कमेबाबत आताच सांगता येणार नाही, मी बैठकीत असल्यामुळे याबाबत सांगू शकत नाही.- एस.बी.कुळकर्णी, शिक्षण उपसंचालकशिक्षण उपसंचालकांनी अमान्य केलेली रक्कम संबंधितांकडून वसूल करण्याची सूचना दिली. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे फटका बसला.- चंदक्रांत गुडेवार, आयुक्त महापालिका