शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नऊ लाखांचे दागिने पळविले

By admin | Updated: October 18, 2014 22:56 IST

भारतीय स्टेट बँकेच्या स्थानिक राठीनगर परिसरातील शाखेसमोर एका निवृत्त बँक व्यवस्थापकाजवळील नऊ लाख रुपये किमतीचे दागिने पळविल्याची घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजता दरम्यान घडली.

राठीनगरातील घटना : निवृत्त बँक व्यवस्थापकाला मोठा गंडा अमरावती : भारतीय स्टेट बँकेच्या स्थानिक राठीनगर परिसरातील शाखेसमोर एका निवृत्त बँक व्यवस्थापकाजवळील नऊ लाख रुपये किमतीचे दागिने पळविल्याची घटना शनिवारी सकाळी ९.३० वाजता दरम्यान घडली. बाळासाहेब शंकर वैद्य असे फसवणूक झालेल्या निवृत्त बँक व्यवस्थापकाचे नाव आहे. त्यांनी दिवाळीनिमित्त पूजेत ठेवण्यासाठी बँकेच्या लॉकरमधून दागिने काढले होते.पंचवटी कॉलनी येथील रहिवासी बाळासाहेब वैद्य यांच्या नातूचा वाढदिवस रविवारी आहे. तसेच दिवाळी सण तोंडावर आल्याने लॉकरमधून दागिने काढण्यासाठी बाळासाहेब वैद्य राठीनगरातील स्टेट बँक आॅफ इंडिया येथे शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास एमएच २७- एबी- ३३३१ या दुचाकी वाहनाने गेले होते. त्यांनी बँकेत जाऊन लॉकरमधून ३०० गॅ्रम व १५० ग्रॅमचे अशा दोन डब्यांमध्ये असलेले सोन्याचे दागिने काढले. बँकेतून सोन्याच्या दागिन्याचे दोन डबे पिशवीत टाकून ते त्यांच्या दुचाकीजवळ आले असता दुचाकी पंक्चर असल्याचे आढळले. बँकेबाहेरच पंक्चर दुरुस्तीचे दुकान होते. परंतु पंक्चर दुरुस्त करणारा कारागीर नव्हता. त्यामुळे बाळासाहेबांनी बँकेजवळील पानटपरी चालक राजू सोनोने याला विचारुन त्यांची दुचाकी पानटपरीजवळील रिकाम्या जागेत ठेवली. गाडी पंक्चर असल्यामुळे काही वेळ घालविण्याकरिता ते आॅटोने सांस्कृतिक भवननजीकच्या एका कार्यालयात गेले. तेथून काही वेळानेते पुन्हा दुचाकी घेण्याकरिता परत आले. दोन अज्ञात युवक बाळासाहेबांजवळ आले आणि त्यांच्या कपड्यांवर घाण पडल्याचे सांगितले. पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखलराठीनगरातील स्टेट बँक आॅफ इंडियासमोर निवृत्त बँक व्यवस्थापकाची फसवणूक झाल्याची माहिती पोलीस विभागाला मिळताच गाडगेनगर पोलीस व गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एसीपी तळवी यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, पीएसआय नितीन थोरात, एपीआय राठोड, राजेश राठोड, संजय बाळापुरे, चैतन्य रोकडे, महेंद्र गावंडे, तसेच गाडगेनगरचे पीएसआय पवार, पाली यांच्यासह चार्ली कमांडो यांनी घटनास्थळी पाहणी करुन घटनेची चौकशी केली.