बातमी/ सारांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST2021-02-17T04:18:32+5:302021-02-17T04:18:32+5:30

अमरावती : येथील एकता रॅली आयोजन समितीच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता मालटेकडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ...

News / Summary | बातमी/ सारांश

बातमी/ सारांश

अमरावती : येथील एकता रॅली आयोजन समितीच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता मालटेकडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. कोरोना नियमावलींचे पालन करीत शिवजयंती साजरी होईल, असे राजू नन्नावरे यांनी कळविले.

---------------

राजापेठ येथे भुयारी कामे संथगतीने

अमरावती : येथील राजापेठ परिसरात भुयारी गटारची कामे संथगतीने सुरू आहे. त्यामुळे वाहनांची वाहतूक उड्डाणपुलावर होत आहे. उड्डाणपूल अरुंद असल्याने वाहनांची कोंडी होत आहे. बरेचदा वाहनांची गर्दी लवकरच कमी होत नाही. त्यामुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो.

-------------------

अकोला महामार्गावर खड्ड्यांनी वाहनचालक त्रस्त

बडनेरा : अमरावती-अकोला मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना रस्ता शोधताना कसरत करावी लागत आहे. लोणी ते बडनेरा दरम्यान खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. संबंधित विभागाने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.

--------------------------

वरुडा गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष

अमरावती : महापालिका हद्दीतील वरुडा गावात विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरिकांची आहे. महापालिका हद्दीतील हे दक्षिणेकडील शेवटचे टोक आहे. मात्र, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाने विकासकामे झाले नाहीत. रस्ते, नाल्याची समस्या कायम आहे. अंतर्गत रस्त्यांची दैना झाली आहे.

------------

बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती रद्द

अमरावती : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी १६ फेब्रुवारी रोजी जयंती कार्यक्रम शासन परिपत्रकानुसार रद्द करण्यात आली आहे. आता जयंती कार्यक्रम २० फेब्रुवारी रोजी होईल, असे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: News / Summary