शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बातम्या प्रादेशिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:17 IST

बडनेरा : नवी वस्तीतील अशोकनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ १५ फेब्रुवारी रोजी अनोळखी ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून ...

बडनेरा : नवी वस्तीतील अशोकनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ १५ फेब्रुवारी रोजी अनोळखी ६५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. ती तीन महिन्यांपासून परिसरात भीक मागून जगत होती. भुकेने व्याकूळ होऊन तिचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज बडनेरा पोलिसांनी व्यक्त केला. या घटनेची नोंद बडनेरा पोलीस ठाण्यात करण्यात आली.

--------

चांदूर बाजार-परतवाडा मार्गावर इसमाचा मृत्यू

बेलोरा (अमरावती) : चांदूर बाजार ते परतवाडा मार्गावर शेतात सोकारी करण्यास जाणारे घनश्याम उद्धवराव बोकडे (४५) यांना एमएच २७ एव्ही ९८१७ क्रमांकाच्या दुचाकीने धडक दिली. १४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. चांदूर बाजार पोलिसांनी अशोक बोकडे (६०, रा शिरजगाव बंड) यांच्या तक्रारीवरून चालक नीलेश विष्णूपंत गतफने (रा. रिद्धपूर) याच्याविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल केला.

-------

कळमगाव येथे रोडरोमिओकडून मारहाण

चांदूर रेल्वे (अमरावती) : तालुक्यातील कळमगाव येथे शाळकरी मुलीची छेड काढणा०या भामट्याने जाब विचारणार्या आजीला शिवीगाळ केली. मध्यस्थी करणार्या मुलीच्या पित्याला विळ्याने जखमी केले. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांनी भादंविचे कलम ३२६, ५०४. ५०६ अन्वये सेनू ऊर्फ अमर दिलीप बनसोड याच्याविरुद्ध रविवारी गुन्हा नोंदविला.