शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

नव्या आघाडीमुळे पदाधिकाऱ्यांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:01 IST

मित्रपक्ष अथवा विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणारी आघाडी जनतेसाठी नवीन नाही. परंतु, यंदा राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचाच मित्रपक्ष शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत एकत्र आली आणि महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करण्यात आली. या आघाडीने आता राज्याच्या सत्तेची सूत्रेदेखील हाती घेतली आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : समन्वय साधताना तिन्ही पक्षांच्या नेत्यांची होणार दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीने बहुमत जिंकल्याने राज्यभरात जल्लोष होत आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या फॉर्म्युल्यामुळे स्थानिक राजकारणाची गणिते मात्र बदलणार आहेत. हे बदल स्वीकारताना, समन्वय साधताना तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे.मित्रपक्ष अथवा विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणारी आघाडी जनतेसाठी नवीन नाही. परंतु, यंदा राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचाच मित्रपक्ष शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत एकत्र आली आणि महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करण्यात आली. या आघाडीने आता राज्याच्या सत्तेची सूत्रेदेखील हाती घेतली आहेत. पाच वर्षे किमान समान कार्यक्रमावर सरकार चालविण्याचा विश्वास आघाडीची नेतेमंडळी व्यक्त करीत आहेत. मात्र, त्याचवेळी राज्य मुख्यालयातील हे चित्र ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगर परिषदेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत टिकविण्याची जबाबदारी आघाडीतील तिन्ही स्थानिक पदाधिकाºयांच्या खांद्यावर येऊन ठेपली आहे.मुळातच मागील काही वर्षांत राज्यातील राजकारणाने कूस बदलली आहे. एखाद्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रसंगी परस्परविरोधी विचारांशी हात मिळविण्यापर्यंत राजकीय पक्षांची मजल गेली आहे. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास येथील जिल्हा परिषद व काही पंचायत समित्यांमध्ये सध्या काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सत्तेत आहे, तर भाजप व इतर मित्रपक्ष विरोधकांची भूमिका बजावत आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्येदेखील अशाच प्रकारच्या युती, आघाड्या कायम आहेत. आता सरकारकडून राबविण्यात येणाºया लोकाभिमुख योजना स्थानिक पातळीवर समाजातील शेवटच्या घटकापर्यत पोहचविण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांवर असल्याने पदाधिकाºयांची चांगलीच दमछाक होणार, हे मात्र नक्की.

टॅग्स :zpजिल्हा परिषद