शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

Navneet Rana: "तुमच्या सात पिढ्या आल्या तरी महाराष्ट्र हिरवा होणार नाही" नवनीत राणांनी जलील यांना सुनावलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 11:15 IST

Navneet Rana on Imtiaz Jaleel: एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्या महाराष्ट्र हिरवा होईल या वक्तव्याला भाजप नेत्या नवनीत राणा यांनी जशास तसे उत्तर दिले.

एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा होईल, असे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वक्तव्यावर भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत जलील यांना जशास तसे उत्तर दिले. "तुमच्या सात पिढ्या आल्या तरी त्या महाराष्ट्राला हिरवा करू शकणार नाहीत," अशा शब्दांत नवनीत राणा यांनी जलील यांना सुनावले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना नवनीत राणा यांनी जलील यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला. त्या म्हणाल्या की, "आम्ही तुम्हाला या देशात अल्पसंख्याक म्हणून राहू दिले याचा अर्थ असा नाही की आम्ही गप्प बसू. गरज पडल्यास आम्हाला प्रत्युत्तर देण्यासाठी १५ सेकंदही पुरेसे आहेत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आमच्या शरीरात आजही छत्रपतींच्या पुत्रांचे आणि भक्तांचे रक्त वाहते. हा महाराष्ट्र कधीही हिरवा होणार नाही." तसेच, जलील ज्या शहरात राहतात, त्या शहराचे नाव आता छत्रपती संभाजीनगर असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.

महिलांचा अपमान सहन करणार नाही

इम्तियाज जलील यांनी महिलांबद्दल वापरलेल्या भाषेवर आणि अपशब्दांवर नवनीत राणा यांनी तीव्र आक्षेप घेतला. "जर तुम्ही महिलांबद्दल अपमानास्पद शब्द वापरणे थांबवले नाही, तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे कठीण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्या पुढे म्हणाल्या की, "जलील यांनी आपले शिष्टाचार पाळावेत आणि सभ्यपणे राहावे. शिस्तीत राहा आणि तुमचे काम करा. जर तुम्ही या देशात अल्पसंख्याक म्हणून जगत असाल, तर चांगले जगा. धमक्या देऊन महाराष्ट्र झुकणार नाही."

English
हिंदी सारांश
Web Title : Navneet Rana slams Jalil: Maharashtra will never turn green.

Web Summary : Navneet Rana strongly criticized Imtiaz Jalil's statement about turning Maharashtra green. She asserted that Maharashtra will always remain under Shivaji Maharaj's legacy, and warned Jalil to respect women or face consequences.
टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाImtiaz Jalilइम्तियाज जलीलBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनPoliticsराजकारण