आरोग्य यंत्रणाच 'व्हेंटिलेटर'वर! NHM चा निधी रखडला; दोन महिन्यांपासून ४० हजार कर्मचाऱ्यांचे पगार बंद

By गणेश वासनिक | Updated: March 11, 2026 11:22 IST2026-03-11T11:19:53+5:302026-03-11T11:22:50+5:30

Maharashtra NHM Salary Crisis:अधिकारी-कर्मचाऱ्यांची गंभीर समस्या, दोन महिन्यांपासून वेतन नाही, अनुदानाचा अभाव

national health mission nhm salary crisis maharashtra 40000 employees without pay | आरोग्य यंत्रणाच 'व्हेंटिलेटर'वर! NHM चा निधी रखडला; दोन महिन्यांपासून ४० हजार कर्मचाऱ्यांचे पगार बंद

आरोग्य यंत्रणाच 'व्हेंटिलेटर'वर! NHM चा निधी रखडला; दोन महिन्यांपासून ४० हजार कर्मचाऱ्यांचे पगार बंद

- गणेश वासनिक

अमरावती : राज्यात प्रत्येक जिल्ह्याचे किमान ९० कोटींच्यावर बजेट असणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियानात (एनएचएम) आज अधिकारी, कर्मचारी पगार करायची सोय राहिली नाही. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांसह आरोग्य योजनाच आजारी होण्याच्या मार्गी आहे. आरोग्य विभागाकडे स्वतः अधिकाऱ्यांच्या वाहनासाठी इंधनाला पैसे नसल्याचे वास्तव आहे. जिल्हा परिषद अनुदान व जिल्हा नियोजनच्या अनुदानावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही, अशी माहिती आहे.

औषधी, संदर्भसेवा, जननी सुरक्षा योजना, जेएसवाय यासह राष्ट्रीय आरोग्य अभियानाद्वारा वित्त पुरवठा केल्या जाणाऱ्या ९ योजना राबविण्यास जिल्हास्तरावर पैसे नाहीत. आशा मानधन व इन्सेंटिव्ह ३ महिन्यांपासून प्रलंबित आहे. कार्यालयांत स्टेशनरी आणण्यासाठी पैसे नसल्याचे कर्मचारी खासगीत सांगतात. राज्यभरात अंदाजे ४० हजार कर्मचारी दोन महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्र सरकारने २०२५ मध्ये राज्याच्या एनएचएमसाठी ३०१ कोटींचा निधी मंजूर केला हाेता. हा निधी एप्रिल, मे या दोन महिन्याच्या वेतनासाठी होता, हे विशेष. त्यानंतर केंद्र सरकारने विशेष अनुदान दिले नाही. कंत्राटदारही ‘एनएचएम’चे काम सोडण्याच्या मन:स्थितीत आले आहे.

स्पर्श प्रणालीतून वेतन, मुंबई मुख्यालय
स्पर्श नावाने नवीन वेतन प्रणाली सुरू केली आहे. पूर्ण महाराष्ट्राचे कोणतेही पेमेंट आता मुंबई येथूनच होतात. त्यामुळे वेळेवर कोणतेच पेमेंट होत नसल्याने कंत्राटदार ही आता एनएचएममध्ये काम करण्यास तयार नाही. रुग्ण कल्याण समिती निधी आलाच नाही. बऱ्याच योजना व निधीवर यावर्षी कपात करण्यात आली असून बांधकाम व प्रशिक्षण बंद पडण्याचे मार्गावर आहे. राज्य स्तरावर एनएचएम सोसायटीला राज्यस्तरावरील ४० टक्के अनुदान अभावी आरोग्यावर महाराष्ट्रात गंभीर संकट आल्याचे वास्तव आहे.

जिल्हानिहाय एनएचएम कर्मचारी
जिल्हा कर्मचारी संख्या
मुंबई ~१,०००
पुणे ~२८००
ठाणे ~२०००
नागपूर ~१५००
नाशिक ~१४००
छत्रपती संभाजीनगर ~१३००
कोल्हापूर ~ ९००
सांगली ~८५०
सोलापूर ~१२००
अहमदनगर ~११००
सातारा ~८५०
रायगड ~७५०
रत्नागिरी ~६००
सिंधुदुर्ग ~४५०
जळगाव ~१०००
धुळे ~६५०
नंदुरबार ~५००
जालना ~७००
परभणी ~६५०
हिंगोली ~४५०
बीड ~९००
लातूर ~८५०
धाराशिव ~६५०
नांदेड ~१२००
अमरावती ~ ८५०
अकोला ~६५०
बुलढाणा ~८००
वाशिम ~५००
यवतमाळ ~९००
वर्धा ~५००
भंडारा ~४५०
गोंदिया ~४५०
चंद्रपूर ~७००
गडचिरोली ~६००
पालघर ~७००

दरमहा १२० ते १५० कोटी वेतनावर खर्च
एनएचएम कर्मचाऱ्यांचे वेतन पदानुसार दिले जाते. यात डॉक्टरांना साधारणत: ६० हजार ते एक लाख रूपये. परिचारिका २० ते ३० हजार, तंत्रज्ञ १८ ते ३० हजार, सरासरी वेतन ४० हजार, एकूण कर्मचारी ४०, ०००
 

केंद्र सरकारचे अनुदान अप्राप्त आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी २०२६ या एकच महिन्याचे वेतन प्रलंबित आहे. निधी येताच तो वितरीत केला जाईल.
- विजय पाटील, वित्त अधिकारी एनएचएम मुंबई

Web Title : महाराष्ट्र का स्वास्थ्य तंत्र वेंटिलेटर पर: एनएचएम फंड में देरी, वेतन रुका

Web Summary : महाराष्ट्र में एनएचएम फंड रुकने से स्वास्थ्य सेवाएं संकट में हैं। 40,000 कर्मचारियों को दो महीने से वेतन नहीं मिला, जिससे राज्य भर में स्वास्थ्य योजनाएं प्रभावित हैं। भुगतान में देरी के कारण ठेकेदार भी हिचकिचा रहे हैं।

Web Title : Maharashtra's Public Health System on Ventilator: NHM Funds Delayed, Salaries Unpaid

Web Summary : Maharashtra's public health faces crisis as NHM funds stall. 40,000 employees haven't been paid for two months, impacting crucial healthcare services and schemes statewide. Contractors are also hesitant due to payment delays.

टॅग्स :Healthआरोग्य