शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

नरखेड रेल्वे पुलाचे एकाच दिवशी दोनदा उद्घाटन

By admin | Updated: December 24, 2016 01:36 IST

बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम अद्याप अपूर्ण असताना शुक्रवारी

लढाई राजकीय श्रेयाची : रवि राणानंतर अडसुळांनीही फोडले नारळ अमरावती : बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम अद्याप अपूर्ण असताना शुक्रवारी लोकप्रतिनिधींनी नाट्यमयरित्या पुलाचे उद्घाटन करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याची किमया देखील केली. सुरूवातीला आ. रवि राणा यांनी फित कापून पुलाचे लोकार्पण केले तर काही वेळाने खा.आनंदराव अडसूळ यांनी नारळ फोडून पुलाचा शुभारंभ झाल्याचे जाहीर केले. याबाबत रेल्वे प्रशासन अनभिज्ञ आहे, हे विशेष. या पुलाचे बांधकाम मागील सात वर्षांपासून सुरू आहे. मात्र, संथगतीमुळे ते वेळेत पूर्ण झाले नाही. परिणामी कंत्राटदाराने पुलाच्या बांधकामाचा अवधी वाढवून मागितला. सध्या यामार्गाच्या डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु अमरावती- बडनेरा मार्गावर नरखेड रेल्वे पुलाच्या अर्धवट बांधकामामुळे वाहन चालक, नागरिक आणि प्रवाशांना होणाऱ्या जीवघेण्या त्रासाचे कारण पुढे करून शुक्रवारी दुपारी १२ वाजता आ. रवि राणा यांनी हा पूल वाहनांसाठी सुरु केला. नरखेड रेल्वे पुलावरून अर्धा किलोमीटर अंतर कापताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. यापुलाचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याचे प्रसार माध्यमांनी लक्षात आणून दिले. तरीही खासदारांना जाग आली नाही. एका पुलाच्या बांधकामाला ७ वर्षे लागत असतील तर ही शोकांतिका आहे. त्यामुळे नरखेड रेल्वे पुलाचा शुभारंभ करुन तो एका बाजुने वाहतुक ीसाठी खुला करण्यात आला. - रवि राणा आमदार, बडनेरा नरखेड रेल्वे मार्गावरील पुलाचे फीत कापून उद्घाटन करताना आ. रवी राणा व त्यांचे समर्थक. त्यानंतर सिटीबस चालकाच्या हस्ते हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. नरखेड रेल्वे मार्गाच्या पूर्णत्वासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. या पुलाच्या बांधकामासाठी केंद्र शासनाकडून निधी आणला आहे. त्यामुळे या कामाचे श्रेय आ. रवि राणांनी घेण्याचा प्रश्नच नाही. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते रेल्वे पुलाचा शुभारंभ व बडनेरातील वॅगन दुरुस्ती कारखान्याची कोनशीला ठेवण्याचे प्रस्तावित होते व त्या दिशेने प्रयत्नही सुरू केले होते. - आनंदराव अडसूळ, खासदार, अमरावती