शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

कुलसचिवपदावर नागपूरकरांचा डोळा! अधिष्ठाताच्या दोन पदांकरिता १७ मे रोजी निवड प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 19:40 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नव्या कुलसचिवपदावर नागपूरकरांचा डोळा आहे. १६ मे रोजी कुलसचिवपदासाठी होऊ घातलेल्या मुलाखतीदरम्यान नागपूर येथील रहिवासी असलेल्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नव्या कुलसचिवपदावर नागपूरकरांचा डोळा आहे. १६ मे रोजी कुलसचिवपदासाठी होऊ घातलेल्या मुलाखतीदरम्यान नागपूर येथील रहिवासी असलेल्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यापीठात प्रशासकीय कामात महत्त्वाचा दुवा मानल्या जाणा-या कुलसचिवपदासाठी एकूण १८ अर्ज पात्र ठरविण्यात आले. त्यानुसार उमेदवारांना १६ मे रोजी होणा-या मुलाखतीच्या अनुषंगाने मेल आणि टपालाद्वारे कळविण्यात आले आहे तसेच नव्याने अधिष्ठाताच्या दोन पदांच्या भरतीसाठी १७ मे रोजी मुलाखतीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. यात ह्यूमॅनिटी अधिष्ठाता पदाकरिता पाच, तर सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी अधिष्ठाता पदासाठी आठ अर्ज प्राप्त झाले. या सर्व उमेदवारांना मुलाखतीसंदर्भात कळविण्यात आले. मात्र, अधिष्ठाता पदभरतीपेक्षा कुलसचिवपदासाठी स्पर्धा तीव्र असल्याचे चित्र आहे. कुलसचिवपदासाठी १८ अर्ज प्राप्त झाले. 

तत्कालीन कुलसचिव अजय देशमुख यांची मुंबई विद्यापीठात समकक्ष पदावर नियुक्ती झाली. त्यामुळे देशमुखांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पदाचा राजीनामा दिला. परिणामी अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिवपद प्रभारी आहे. मध्यतंरी लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे ही पदभरती पुढे ढकलण्यात आली. मात्र, गत महिन्यात राज्यपाल कार्यालयाने कुलसचिव, अधिष्ठाता पदभरतीसाठी परवानगी दिली. त्यामुळे विद्यापीठाने पदभरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. कुलसचिव या महत्त्वाच्या पदावर आसनस्थ होण्यासाठी नागपूर येथील एका उमेदवाराने प्रचंड लॉबिंग चालविले आहे. ‘परिवारा’तील व्यक्ती असल्याने ‘ते’ नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे.

प्रभारी कुलसचिवांना ‘लॉटरी’?विद्यापीठ कुलसचिवपदाचा प्रभार डी.एस. राऊत यांच्याकडे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी सोपविला. दरम्यान, राऊत यांनीदेखील कुलसचिवपदासाठी अर्ज सादर केला आहे. त्यामुळे १६ मे रोजी मुलाखतीदरम्यान डी.एस. राऊत यांना कायमस्वरूपी नियुक्तीची ‘लॉटरी’ लागू शकते, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात रंगत आहे. राऊत हे शिस्तप्रिय आणि नियमानुसार कामकाज हाताळणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात.   कुलसचिवपदासाठी हे १८ उमेदवार पात्रविद्यापीठात कुलसचिवपदासाठी १८ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत. यात अदापुरे, दिनेश चौधरी, चव्हाण, चितलांगे, दालवे, तुषार देशमुख, प्रीती घाटे, हिरेखन, संजय खड्डकार, सुलेकर, एफ.सी. रघुवंशी, रामटेके, प्रशांत गावंडे, प्रफुल्ल उबाळे, जयंत वडते, विलास नांदूरकर, डी.एस. राऊत, संजय खेरडे यांचा समावेश आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती