शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतींचा बिगूल; मार्चमध्ये निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST

अनेक इच्छुक बाशिंग बांधून तयार : गुलाबी थंडीत राजकीय वातावरण तापले धारणी : जिल्ह्यातील भातकुली, तिवसा, नांदगाव खंडेश्वर ...

अनेक इच्छुक बाशिंग बांधून तयार : गुलाबी थंडीत राजकीय वातावरण तापले

धारणी : जिल्ह्यातील भातकुली, तिवसा, नांदगाव खंडेश्वर व धारणी या चार नगरपंचायतींसाठी मार्च महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होण्याचे संकेत आहेत. मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने ८ मार्चनंतर केव्हाही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते. त्यादृष्टीने मेळघाटातील गुलाबी थंडीत राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

२९ नोव्हेंबर २०२० रोजी चारही नगरपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आला. तेथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. त्यावेळीपासून निवडणुकीची प्रतीक्षा शिगेला पोहोचली आहे. दरम्यान प्रभागातील संरचना आणि प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आता २ फेब्रुवारी रोजी मतदार यादी प्रकाशित करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्यानंतर साधारणत: मार्चमध्ये नगरपंचायत निवडणूक होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचे चेहरे फुलले असून त्यांनी पुन्हा नव्या जोमाने तयारीला सुरुवात केली आहे. १५ फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे, तर, ८ मार्च रोजी चारही नगरपंचायतीमधील मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिध्द केली जाणार आहे. आठवडाभरापासून मेळघाटात थंडीने जोर धरला असला तरी नगरपंचायत निवडणूक असल्यामुळे शहरातील वातावरण तापले आहे.

१७ प्रभागात चुरस

धारणी शहरात एकूण १७ प्रभाग असून, त्यापैकी ९ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. अनेक मावळत्या नगरसेवकांनी निवडणुकीची तयारी चालविली असून, तरुण वर्गदेखील सरसावला आहे. त्यामुळे प्रस्थापित विरुद्ध तरुण यांच्या दरम्यान खरी लढत होण्याचे चिन्ह दिसत आहेत. घोषणेपूर्वी सर्व राजकीय पक्षांनी संभाव्य उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, युवा स्वाभिमान पक्ष, प्रहार आणि बहुजन समाज पक्षामार्फत चाचपणी केली जात आहे.

------------