शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

टाकरखेडा पूर्णा येथील घरात रहस्यमय आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 05:00 IST

हाकेच्या अंतरावर असलेल्या टाकरखेडा पूर्णा येथील रामसेवक पातालबंसी यांचे टीन व कौलारू घर आहे. मंगळवारपासून रहस्यमयरीत्या घरातील विविध कापडी व प्लास्टिक साहित्याला अचानक आग लागत आहे. त्यामुळे घरातील सदस्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर कुटुंबाने हा प्रकार विद्युत पुरवठ्यातील दोषामुळे घडत असल्याचा संशय करीत महावितरणकडे तक्रार केली व वीजपुरवठा बंद करण्याचे सांगितले. 

ठळक मुद्देअंधश्रद्धा : कापड, प्लास्टिक अचानक पेट घेत असल्याचा दावा, कुटुंब दहशतीखाली, चर्चेला उधाण

  किशोर मोकलकर    लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेडा पूर्णा : सध्या जग विज्ञान युगाकडे  वाटचाल करीत आहे. तंत्रज्ञानाच्या साथीने मानवाने सर्व गोष्टींवर मात करण्यात यश प्राप्त केले. मात्र, आजही रहस्यमय घटना घडत असल्याचे प्रकार ऐकायला येतात. अशीच एक रहस्यमय घटना टाकरखेडा पूर्णा येथील सध्या परिसरात चर्चेचा विषय बनला असून,  एका घरातील कापड व प्लास्टिकच्या वस्तू अचानक पेट घेत असल्याचा प्रकार घडत असल्याने येथील कुटुंब दोन दिवसांपासून दहशतीत आहे.हाकेच्या अंतरावर असलेल्या टाकरखेडा पूर्णा येथील रामसेवक पातालबंसी यांचे टीन व कौलारू घर आहे. मंगळवारपासून रहस्यमयरीत्या घरातील विविध कापडी व प्लास्टिक साहित्याला अचानक आग लागत आहे. त्यामुळे घरातील सदस्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर कुटुंबाने हा प्रकार विद्युत पुरवठ्यातील दोषामुळे घडत असल्याचा संशय करीत महावितरणकडे तक्रार केली व वीजपुरवठा बंद करण्याचे सांगितले. सदर तक्रारीवरून कर्मचार्‍यांनी घराचा वीजपुरवठा बंद करून सर्व्हिस लाईन वायर व अर्थिंग तारसुद्धा वेगळा केला. परंतु, वीजपुरवठा बंद करूनसुद्धा आगीच्या घटना घडत असल्याचे कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. घरातील कापड व प्लास्टिकसारख्या वस्तू पेट घेत असल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी प्लास्टिक व कापडसारख्या वस्तू घराबाहेर ठेवल्या आहेत. दोन दिवसांपासून घरात रहस्यमयरीत्या आग लागत असल्याने संपूर्ण कुटुंब दहशतीत दिवस काढत आहे. नागरिकांमध्ये विविध  चर्चेला पेव फुटले आहे. सदर घटनेची माहिती आसेगाव पोलिसांनासुद्धा दिल्याचे पातालबंसी  कुटुंबाने सांगितले.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती करणार का सत्यशोधन?अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याप्रकरणी तातडीने दखल घेणे आता गरजेचे झाले आहे. अचानक आग लागून घरातील वस्तू-वस्त्रे जळण्याच्या अनेक घटना अंधश्रद्धेवर आधारित असल्याची सत्यता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यापूर्वीही उघडकीस आणली आहे. या घटनेतही अंनिसने घटनास्थळी सत्यशोधन करून वस्तुस्थिती सर्वांसमोर उघड करावी, अशी अपेक्षा विज्ञानवादी लोकांनी व्यक्त केली आहे. 

 सदर कुटुंबाने घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागत असल्याचे सांगितले. परंतु, घटनास्थळाला भेट दिली असता, असा कुठलाही प्रकार निदर्शनास आला नाही. त्यांनी वीजपुरवठा खांबावरूनच बंद करण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून वीजपुरवठा बंद करण्यात आला. परंतु, सदर प्रकार घडतच असल्याचे या कुटुंबाने सांगितले.- मयूर वसू, वरिष्ठ तंत्रज्ञ, महावितरण केंद्र, आसेगाव पूर्णा 

 

टॅग्स :fireआग