महापालिकेची ज्येष्ठांसाठी ‘मिशन व्हॅक्सिनेशन’ माेहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 23:50 IST2021-03-06T05:00:00+5:302021-03-05T23:50:03+5:30

महापालिकेतर्फे डॉ.पंजाबराव देशमुख महाविद्यालय व दंत महाविद्यालय येथे ज्‍येष्‍ठांसाठी लसीकरण सुरू केले आहे. शुक्रवारी  नव्‍याने आयसोलेशन दवाखाना दसरा मैदान, बडनेरा येथे मोदी हॉस्‍पिटल, भाजीबाजार येथील शहरी आरोग्‍य केंद्र महेंद्र कॉलनी, शहरी आरोग्‍य केंद् दस्‍तुरनगर, मनपा शाळा नागपुरी गेट हे सहा केंद्र सुरू करण्‍यात आले आहे.

Municipal Corporation's 'Mission Vaccination' campaign for seniors | महापालिकेची ज्येष्ठांसाठी ‘मिशन व्हॅक्सिनेशन’ माेहीम

महापालिकेची ज्येष्ठांसाठी ‘मिशन व्हॅक्सिनेशन’ माेहीम

ठळक मुद्देमहापौरांच्या हस्ते प्रारंभ, शुक्रवारी नव्याने सहा केंद्रे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका प्रशासनाने ज्येष्ठांसाठी ‘मिशन व्हॅक्सिनेशन’ मोहिमेंतर्गत शुक्रवारी शहरात नव्याने सहा लसीकरण केंद्रे सुरू केले. त्यामुळे आता ४५ वर्षांवरील को-मॉर्बेडिटी रुग्ण व ज्येष्ठांना लसीकरण सोयीचे  होणार आहे.
महापालिकेतर्फे डॉ.पंजाबराव देशमुख महाविद्यालय व दंत महाविद्यालय येथे ज्‍येष्‍ठांसाठी लसीकरण सुरू केले आहे. शुक्रवारी  नव्‍याने आयसोलेशन दवाखाना दसरा मैदान, बडनेरा येथे मोदी हॉस्‍पिटल, भाजीबाजार येथील शहरी आरोग्‍य केंद्र महेंद्र कॉलनी, शहरी आरोग्‍य केंद् दस्‍तुरनगर, मनपा शाळा नागपुरी गेट हे सहा केंद्र सुरू करण्‍यात आले आहे. या मोहिमेला गतिमान करण्यासाठी  महापौर चेतन गावंडे यांच्‍या उपस्थितीत भाजीबाजार येथे आझाद हिंद मंडळाचे सभासद प्रकाश संगेकर व नीळकंठ मंडळाचे सभासद प्रमोद गंगात्रे यांना लस देऊन मोहिमेची सुरुवात झाली. यावेळी आयुक्‍त प्रशांत रोडे, माजी महापौर विलास इंगोले, विवेक कलोती, नगरसेवक आशिष अतकरे, उपायुक्‍त रवि पवार, वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी विशाल काळे उपस्थित होते. 
बडनेरा स्थित मोदी हॉस्पिटल येथे भास्करराव कुळकर्णी यांना लस देऊन कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर चेतन गावंडे, आयुक्त प्रशांत रोडे, भाजपाचे  शिवराय कुळकर्णी, नगरसेवक प्रकाश बनसोड, गंगा अंभोरे, मो. इमरान, सहायक आयुक्‍त विशाखा मोटघरे, सई कुळकर्णी उपस्थित होते. शहरी आरोग्‍य केंद्र दस्‍तुरनगरात लस घेऊन या केंद्राच्‍या लसीकरणात वसंत आबाजी डाहाके यांनी सहभाग नोंदवला.

Web Title: Municipal Corporation's 'Mission Vaccination' campaign for seniors