शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
2
Maharashtra SSC Result 2026 LIVE Updates: दहावीचा निकाल जाहीर! ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभाग सर्वात अव्वल
3
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
4
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
5
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
6
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
7
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
8
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
9
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
10
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
11
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
12
Hantavirus: चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
13
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
14
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
15
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
16
बंगळुरूच्या जोडप्यानं श्रीलंकेहून पोहत गाठला भारत; १० तास ४५ मिनिटांत ३२ किलोमीटर अंतर कापलं
17
Viral Video: रस्त्याच्या कडेला पडलेल्या होत्या तीन बॅगा, आतमध्ये मिळाले २ कोटी ८३ लाख, पण...
18
Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २१३ आणि निफ्टी ९३ अंकांच्या घसरणीसह खुला
19
Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
20
१० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष; दुकानदाराकडून अत्याचाराचा प्रयत्न, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेची द्विनोंद लेखा पद्धतीशी फारकत !

By admin | Updated: September 12, 2016 00:12 IST

राज्यातील सर्व ‘ड’ वर्ग महानगरपालिकांनी द्विनोंद लेखापद्धतीची अंमलबजावणी करणे बंधनकारक असताना ...

कार्यान्वयन केव्हा ? : राष्ट्रीय लेखा नियम संहितेचा वापर
अमरावती : राज्यातील सर्व ‘ड’ वर्ग महानगरपालिकांनी द्विनोंद लेखापद्धतीची अंमलबजावणी करणे बंधनकारक असताना बहुतांश महापालिकांनी या पद्धतीशी फारकत घेतल्याचे वास्तव उघड झाले आहे. अमरावती महापालिकेने या पद्धतीला फाटा दिल्याची नोंदही लेखापरीक्षकांनी घेतली होती. मात्र त्यानंतरही पद्धती कार्यान्वयित केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
६ जुलै २००५ रोजीच्या शासननिर्णयान्वये राज्यातील सर्व महापालिकांनी द्विनोंद लेखा पद्धतीची अंमलबजावणी करण्याची सूचना नगरविकास विभागाने दिली होती. त्यानुसार राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकेला सन २००६-०७ पासून करणे बंधनकारक आहे. अमरावती महापालिकेने सन २०१४ पर्यंत द्विनोंद लेखा पद्धतीची अंमलबजावणी केलेली नव्हती. तसा आक्षेपच सन २०११-१२ या वित्तीय वर्षातील लेखापरीक्षणात घेण्यात आला होता.
द्विनोंद लेखा पद्धतीच्या अंमलबजावणीसाठी राज्य लेखासंहिता तयार होईपर्यंत राष्ट्रीय लेखा नियम पुस्तिकेचा वापर करावा. त्यानुसार वार्षिक अंदाजपत्रक, ताळमेळ, वार्षिक लेखे, उत्पन्न आणि खर्चाचे विवरणपत्र, बँक ताळमेळ, ठेवी, स्थायी/ अस्थायी कायम, वैयक्तीक व किरकोळ अग्रीमचे विवरणपत्र ठेवणे आवश्यक आहे. लेखे व्यवस्थित ठेवण्यासाठी द्विनोंद पद्धती अनिवार्य असल्याच्या सूचना वेळोवेळी यंत्रणेला देण्यात आल्यात. मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी पूर्वीच्या रोख तत्त्वावर लेखा ठेवण्याची पद्धती व दुहेरी नोंद लेखा पद्धतीत लेखा ठेवणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे द्विनोंद पद्धतीने लेखे व्यवस्थित ठेवणे शक्य आहे, अशी खात्री झाल्यास सदर पद्धत नगरविकास विभाग संचालनालयाचे आयुक्त तथा संचालकांच्या सहमतीने द्विनोंद लेखा पद्धती पूर्णपणे अंगिकारावी, असे स्पष्ट आदेश होते. महापालिका स्तरावर मात्र याबाबत सामसूम आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक व्यवहारात अचुकता आणि पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने दुहेरी नोंद लेखा पद्धतीने लेखे ठेवणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)

लेखा परीक्षण अहवालात आक्षेप
स्थानिक निधी लेखा विभागाने २०११-१३ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करताना अमरावती महापालिका यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. २०१४ पर्यंत द्विनोंद लेखा पद्धती अमरावती महापालिकेने कार्यान्वित केल्याने शासननिर्णयाच्या उद्देशाची फलश्रुती झाली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. उल्लेखनीय म्हणजे लेखापरीक्षकांना याबाबत यंत्रणेद्वारे माहितीसुद्धा पुरविण्यात आली नाही. दुहेरी नोंद लेखा पद्धतीची माहिती लेखापरीक्षकास देणे महाराष्ट्र स्थानिक निधीलेखा परीक्षा अधिनियम १९३० चे कलम ६ अन्वये बंधनकारक आहे.

द्विनोंद लेखा पद्धती कशासाठी ?
नागरी स्वराज्य संस्थांचे लेखा रोख तत्त्वावर ठेवण्यात येत होते. यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांची पत समजून येत नाही. तसेच या संस्थांच्या वित्तीय स्थितीचे विश्लेषण होऊ शकत नव्हते. ९० च्या दशकात देशात सुरू झालेल्या आर्थिक सुधारणा प्रक्रियेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भूमिकेत महत्त्वाचा बदल अपेक्षित असून, स्थानिक स्वराज्य संस्था ते पार पाडत असलेल्या कामांसाठी जबाबदार ठरणार आहेत. या बदलामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विद्यमान आर्थिक व्यवस्थापन पद्धतीत सुधारणा करणे कमप्राप्त आहे. ही बाब विचारात घेऊन दुहेरी नोंद लेखा पद्धत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू करणे अत्यावश्यक झाले होते. त्याअनुषंगाने २००५ मध्ये या पद्धतीचा जन्म झाला.