शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बाभळीच्या पुलासाठी पालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र

By admin | Updated: December 14, 2015 00:23 IST

बाभळी येथील चंद्रभागा नदीवरील जीवघेण्या लहान पुलाच्या बांधकामाचे नाहरकतप्रमाणपत्र अखेर ठराव घेऊन नगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.

बांधकामाचा मार्ग सुकर : जबाबदारी आता लोकप्रतिनिधींचीसंदीप मानकर दर्यापूरबाभळी येथील चंद्रभागा नदीवरील जीवघेण्या लहान पुलाच्या बांधकामाचे नाहरकतप्रमाणपत्र अखेर ठराव घेऊन नगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. आता या पुलाच्या बांधकामाचा मार्ग सुकर झाला असून आता पुलाची बांधकामाची जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे, अशी भावना बाभळीवासीयांनी व्यक्त केली आहे.नदीच्या लहानपुलाच्याखाली मोठा डोह असल्याने व येथे बाराही महिने गाळ व दूषित पाणी साचले असल्याने अंदाजे तीस वर्षांत ३५ निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. तसेच येथे गुराढोरांचेही प्राण गेले आहे. अनेकांनी तर येथे आत्महत्या केल्या. तर, पुलावरुन पाणी वाहत असताना गेल्यामुळे अनेक वाहून गेले आहे. त्यामुळे हा पूल तोडून नव्याने रुंदीकरण करावे, अशी दर्यापूर, बनोसा व बाभळी परिसरातील लोकांची मागणी आहे. परंतु या पुलाचा प्रस्ताव पाठविण्यामध्ये आतापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाला अडचण येत होती. कारण हा पूल नगरपालिकेने करावा की आमदार निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने करावा, असा वाद नेहमीच रंगत होता.दरम्यान या पुलावरून अनेकांचा अपघात झाला. परंतु आता नगरपालिकेने नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने या पुलाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करून शासनाकडे पाठवावा व यासाठी आमदार रमेश बुंदिले यांनी प्रयत्न करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष जयंत वाकोडे व बाभळी येथील समस्त नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र आल्यानंतर आम्ही नगर पालिकेत ठराव घेऊन या पुुलाच्या बांधकामासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन प्रस्ताव पाठवावा व लोकप्रतिनिधीने यासाठी प्रयत्न करावे. पूल झाल्यास मला आनंदच होईल. लोकांची समस्या कायमची सुटेल. - वंदना राजगुरे, नगराध्यक्ष, दर्यापूर.बाभळी येथील नदीच्या पुलाच्या रुंदीकरणा संदर्भात प्रस्ताव तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला निर्देश दिले आहे. लवकरच बांधकाम विभाग हा प्रस्ताव शासनाच्या मंजुरातीसाठी पाठविणार आहे.- रमेश बुंदिले, आमदार, दर्यापूर मतदारसंघ.