शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २० लाख नवीन वीजमीटरचा महावितरणकडून पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीजमीटरचा निर्माण झालेला तुटवडा दूर करण्यासाठी महावितरणने निविदाअंतर्गत पुरवठादारांना १८ लाख सिंगलफेज, तर ...

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीजमीटरचा निर्माण झालेला तुटवडा दूर करण्यासाठी महावितरणने निविदाअंतर्गत पुरवठादारांना १८ लाख सिंगलफेज, तर १ लाख ७० हजार थ्रीफेज नवीन वीजमीटर पुरवठ्याच्या दिलेल्या कार्यादेशान्वये १ लाख ४४ हजार ९०४ वीजमीटर महावितरणकडे उपलब्ध झाले असून, मार्चअखेरपर्यंत ३ लाख ८० हजार वीजमीटरचा पुरवठा होणार आहे.

महावितरणकडून दरवर्षी ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. मार्च २०२० नंतर कोरोना प्रादुर्भाव व ‘लॉकडाऊन’मुळे नवीन वीजमीटरची उपलब्धता काही प्रमाणात कमी झाली होती. तरीही जून २०२० नंतर महावितरणतर्फे ६ लाख ५० हजार ५२३ सिंगल फेज, तर ६२ हजार ५५ थ्रीफेज ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत. मीटरअभावी ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध झालेले वीजमीटर तातडीने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश मुख्य कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेले आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मुबलक वीजमीटरच्या उपलब्धतेसाठी एका वर्षापेक्षा अधिक कालावधीचे नियोजन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत वीजमीटरची कमतरता जाणवणार नाही, यासाठी महावितरणतर्फे उपाययोजना करण्यात आलेली आहे. त्यानुसार निविदा प्रक्रियेद्वारे सिंगल फेजचे १८ लाख आणि थ्री फेजचे १ लाख ७० हजार असे एकूण १९ लाख ७० हजार नवीन वीजमीटरचा १० फेब्रुवारी २०२१ रोजी दिलेल्या पुरवठा आदेशाचा महावितरणमार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे. वीजमीटरच्या तुटवड्याअभावी वीजग्राहकांची गैरसोय होणार नाही, यासाठी निश्चित केलेल्या कालावधीनुसार वीजमीटरचा क्षेत्रीय कार्यालयांना नियमित पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री सिंघल यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत वरिष्ठ अधिकारी व पुरवठादारांना दिले आहेत.

सद्यस्थितीत महावितरणच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाकडे ३८ हजार ७०४, कोकण प्रादेशिक कार्यालयांकडे ६९ हजार ७००, नागपूर प्रादेशिक कार्यालयाकडे २० हजार तर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाकडे १६ हजार ५०० या प्रमाणात वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीत महावितरणला दररोज सुमारे ८ ते १० हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा सुरू झाला असून, मार्चअखेर सिंगल फेजचे ३ लाख २० हजार आणि थ्रीफेजचे ६० हजार नवीन मीटर उपलब्ध होणार आहेत. तसेच एप्रिल ते ऑगस्ट-२०२१ पर्यंत सिंगल व थ्री फेजचे तब्बल १४ लाख ६० हजार नवीन वीजमीटर उपलब्ध होणार आहेत. महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सध्या सिंगल फेजचे २ लाख ४१ हजार ८८२ तर थ्रीफेजचे २८ हजार ३८६ नवीन वीजमीटर उपलब्ध असून वीजमीटरचा कोणताही तुटवडा भासणार नाही. सध्या महावितरणतर्फे पर्याप्त मीटर उपलब्ध करून देण्यात आले असून ग्राहकांनी खुल्या बाजारातून वीजमीटर खरेदी करण्याची आवश्यकता नसल्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.