वादळाच्या तडाख्यात महावितरणचे एक कोटी ६६ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 05:00 AM2020-05-18T05:00:00+5:302020-05-18T05:01:17+5:30

कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी जिल्ह्यातही २२ मार्चपासून संपूर्ण 'लॉकडाऊन' आहे. अनेक कर्मचारी घरूनच काम करीत आहेत. विजेशिवाय हे शक्यच नाही. संपूर्ण बंदच्या काळात अखंडित वीज सेवा देणे ही तारेवरची कसरत करताना जिल्हाभरातील हजारो प्रकाशदुतांचे हात कोरोनाच्या प्रादुभार्वातही दिवस-रात्र राबताना दिसत आहेत. वादळ वाऱ्यामुळे बसलेल्या फटक्यामुळे महावितरणचे सुमारे १ कोटी ६६ लाखांचे नुकसान झाले.

MSEDCL loses Rs 1.66 crore due to storm | वादळाच्या तडाख्यात महावितरणचे एक कोटी ६६ लाखांचे नुकसान

वादळाच्या तडाख्यात महावितरणचे एक कोटी ६६ लाखांचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्दे७८३ विजेचे खांब कोसळले : १०५ किमी वीजवाहिन्या तुटल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात रविवार, १० मे रोजी सायंकाळी अवकाळी पावसासह झालेल्या वादळाचा फार मोठा तडाखा महावितरणला बसला. यात ठिकठिकाणी झाडे, वीज वाहिन्या व ७८३ विजेचे खांब उन्मळून पडले. महावितरणचे वीज खांब वाकले आहे, तर जवळपास १०५ किमीपेक्षा जास्त वीज वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. महावितरणच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी युद्धस्तरावरील प्रयत्नाने जिल्ह्यातील वीज व्यवस्था पूर्ववत करण्यास यश आले.
कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी जिल्ह्यातही २२ मार्चपासून संपूर्ण 'लॉकडाऊन' आहे. अनेक कर्मचारी घरूनच काम करीत आहेत. विजेशिवाय हे शक्यच नाही. संपूर्ण बंदच्या काळात अखंडित वीज सेवा देणे ही तारेवरची कसरत करताना जिल्हाभरातील हजारो प्रकाशदुतांचे हात कोरोनाच्या प्रादुभार्वातही दिवस-रात्र राबताना दिसत आहेत. वादळ वाऱ्यामुळे बसलेल्या फटक्यामुळे महावितरणचे सुमारे १ कोटी ६६ लाखांचे नुकसान झाले. अमरावती शहर विभागातील उच्चदाबाचे एक आणि लघुदाबाचे ९४ विजेचे खांब वादळामुळे जमीनदोस्त झाले आहेत. मोर्शी विभागातील उच्चदाबाचे ३०, तर लघुदाबाचे ७४ वीज खांब कोसळले आहेत. अमरावती ग्रामीण विभागात उच्चदाबाचे ८१ आणि लघुदाबाचे २१९ वीज खांब वादळामुळे कोसळले आहे. अचलपूर विभागातील १३५ लघुदाबाचे आणि १५० उच्चदाबाचे वीज खांब जमिनीवर पडले आहेत.

उच्चदाब वाहिन्याही तुटल्या
अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाड पडल्याने शहरातील ०.८३ किमी उच्चदाब वीज वाहिनी, तर १३.२ किमी लघुदाब वाहिनी तुटली. ग्रामीण विभागात १० किमी उच्चदाब आणि ३० किमी लघुदाब वाहिनी खराब झाली. मोर्शी विभागात १२ किमी उच्चदाब आणि १२ किमी लघुदाब वाहिनी तुटली आहे. अचलपूर विभागातील ९.३६ किमी उच्चदाब १९ किमी लघुदाब वाहिनी तुटली आहे. एवढेच नाही तर अमरावती शहरातील ७, अचलपूर १ आणि मोर्शी विभागातील ५ रोहित्रे निकामी झाले. लघुदाबाचे १०९ आणि उच्चदाबाचे ११९ वीज खांब झुकल्याने अनेक भागांचा वीजपुरवठा प्रभावित झाला. जिल्ह्यतील वीजपुरवठा पूर्ववत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: MSEDCL loses Rs 1.66 crore due to storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.