शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

दीड किलोमीटरपर्यंत पहाड खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:01 IST

मेळघाटात पावसाने कहर केला. २२ जुलै रोजी ढगफुटीसारख्या पावसाने सेमाडोह-माखला-चुनखडी मार्गावर  दीड किलोमीटर किलोमीटरपर्यंत पहाड कोसळत आला. व्याघ्र प्रकल्पाच्या अंमलाखालील क्षेत्रातून हा रस्ता जातो. या  मार्गातील बिच्छुखेडा, माडीझडप या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. दीड किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर सलग मोठे पाषाण, सागवान, बांबूचे झाड, माती यामुळे पूर्ण रस्ता ब्लॉक झाला आहे. 

ठळक मुद्देमेळघाटात ढगफुटीचा परिणाम, सेमाडोह-माखला मार्गावर कोसळले पाषाण, झाडे

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाटात  सातपुडा पर्वतराजीच्या कडा खचून सेमाडोह-माखला-चुनखडी मार्गावर दीड किलोमीटरपर्यंत रस्त्यावर चिखल, झाडे व दगडांचा खच लागल्याचे शनिवारी सायंकाळी अभियंत्यांच्या पाहणीत पुढे आले. वाहतुकीसाठी धोकादायक ठरलेल्या या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मेळघाटात पावसाने कहर केला. २२ जुलै रोजी ढगफुटीसारख्या पावसाने सेमाडोह-माखला-चुनखडी मार्गावर  दीड किलोमीटर किलोमीटरपर्यंत पहाड कोसळत आला. शनिवारी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता प्रमोद ठाकरे, शाखा अभियंता राहुल शेंडे, जिल्हा परिषद सदस्य सुनंदा काकड, शिवा काकड, व्याघ्र प्रकल्प कर्मचारी आदींनी मार्ग सुरळीत करण्यासाठी पाहणी दौरा केला असता, हा धक्कादायक प्रकार पुढे आला. व्याघ्र प्रकल्पाच्या अंमलाखालील क्षेत्रातून हा रस्ता जातो. या  मार्गातील बिच्छुखेडा, माडीझडप या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. 

बिच्छुखेडा, माडीझडप ही दोन्ही गावे खचलेला रस्ता व नदीला पूर यामुळे संपर्कविहीन झाली आहेत. दोन गर्भवती माता व इतर आजारांसाठी केवळ अंगणवाडी सेविका गावात आहेत. - डॉ. आदित्य पाटील, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र

रस्त्याला आठवड्यापेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. दोन गावांचा संपर्क तुटला आहे. दीड किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर सलग मोठे पाषाण, सागवान, बांबूचे झाड, माती यामुळे पूर्ण रस्ता ब्लॉक झाला आहे. - प्रमोद ठाकरे, उपविभागीय अभियंता

दोन जेसीबीने आठवडाभर लागणारदोन जेसीबी यंत्राद्वारे सलग काम केल्यास  रस्ता क्लिअर होण्यास कमीतकमी एक आठवडा लागू शकतो, असा अंदाज उपस्थित बांधकाम अभियंत्यांनी काढला आहे. 

बांबू, सागवानाची झाडे पाषाण कोसळले सेमाडोह-माखला रस्त्यावर सागवान, बांबूची झाडे, मोठे पाषाण रस्त्यावर आले. जेसीबीलाही ते उचलले जाणार नसल्याने ब्लास्टिंग करून रस्ता मोकळा करावा लागणार आहे.  

माखला, बिच्चुखेडा, माडीझडप संपर्क क्षेत्राबाहेरदरड कोसळल्याने माखला, बिच्छुखेडा, माडीझडप या तिन्ही गावे संपर्काबाहेर झाली आहे. दोन्ही मार्गावरील या गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी होत आहे. या मार्गावर जवळपास एक कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यानंतरच आदिवासी पाडे जगाच्या संपर्कात येणार आहेत. 

आरोग्य यंत्रणा हतबल दोन गर्भवती माता  बिच्छुखेडा, माडीझडप येथे दोन गर्भवती माता आहेत. खंडू नदीलाही पूर असल्याने दोन्हीकडील मार्ग बंद झाले आहेत. अशात आदिवासी महिला व कुपोषित बालकांचा उपचार व इतरही समस्या निर्माण झाल्या आहेत. आरोग्य यंत्रणा पोहोचू शकत नसल्याचे काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Rainपाऊस