शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘लकी ड्रॉ’च्या नावावर गंडविले

By admin | Updated: February 26, 2016 00:26 IST

लकी ड्रॉमध्ये चार चाकी वाहनाचे बक्षीस लागल्याची बतावणी करून महिलेला १४ हजार ८०० रुपयांनी गंडविल्याचा प्रकार उघड झाला.

अमरावती : लकी ड्रॉमध्ये चार चाकी वाहनाचे बक्षीस लागल्याची बतावणी करून महिलेला १४ हजार ८०० रुपयांनी गंडविल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी ७५४९४२५२५७ क्रमांकाचा भ्रमणध्वनीधारक राजेशकुमारविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या स्पर्धेच्या मानकरी ठरल्या असून आपल्याला चारचाकीचे पारितोषिक मिळाले आहे, अशी बतावणी करणारा भ्रमणध्वनी या महिलेला २४ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजताच्या सुमारास आला. त्याचवेळी राजेशकुमार नामक आरोपीने शाम चौकातील एसबीआय शाखेतील खाते क्रमांक देऊन ६५०० रुपये भरण्यास सांगितले. महिलेने २ हजार रुपये जमा केले. त्यानंतर १२ लाख ८० हजार रुपये मंजूर झाल्याचे महिलेला सांगून त्यासाठी १ टक्का अर्थात १२,८०० रूपये बँकेत जमा करण्याचा निरोप भ्रमणध्वनीवर संपर्क साधून देण्यात आला. त्यानुसार महिलेने बुधवारी दुपारी १२ हजार ८०० रुपये एसबीआय खात्यात जमा केले. त्यानंतर पुन्हा २५,६०० रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. मात्र, रक्कम न भरण्याची भूमिका या महिलेने घेतली. मात्र त्यांना आधी भरलेली रक्कम परत मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने शहर कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली. (प्रतिनिधी)