पिकअप-स्कुटी अपघातात अल्पवयीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST2021-02-05T05:32:23+5:302021-02-05T05:32:23+5:30

एक गंभीर जखमी, दोन्ही वाहनांनी घेतला पेट, टाकरखेडा पूर्णा येथील घटना आसेगाव पूर्णा : अमरावती-परतवाडा महामार्गावरील ...

Minor killed in pickup-scooter accident | पिकअप-स्कुटी अपघातात अल्पवयीन ठार

पिकअप-स्कुटी अपघातात अल्पवयीन ठार

एक गंभीर जखमी, दोन्ही वाहनांनी घेतला पेट, टाकरखेडा पूर्णा येथील घटना

आसेगाव पूर्णा : अमरावती-परतवाडा महामार्गावरील टाकरखेडा पूर्णा येथे पिकअप व स्कुटी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत दुचाकीवरील एका अल्पवयीनाचा जागीच मृत्यू झाला. एक गंभीररीत्या जखमी झाला.

निवृत्ती दीपकराज सोलव (१४, रा. तळणी पूर्णा) या अल्पवयीनाचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर सार्थक अनंतराव वैद्य (१६, दोन्ही रा. तळणी पूर्णा) हा गंभीररीत्या जखमी झाला. हे दोघेही तळणी येथून दुचाकीने आसेगावकडे येत होते. अमरावतीहून निंभारीकडे जाणाऱ्या पिकअप (एमएच २७ बीएक्स ३८१२) या भरधाव वाहनाने जबर धडक दिल्याने दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या अपघातात निवृत्तीचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर सार्थक हा गंभीर जखमी झाला. त्याला अमरावती येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता रवाना करण्यात आले. पिकअप निंभारी येथील सगणे यांचे असून, ते वाहन अमरावतीवरून निंभारीकडे वाहनचालक योगेश सुभाष सगणे हा घेऊन येत होता. अपघात होताच वाहनचालक घटनास्थळाहून पसार झाला. वृत्त लिहिस्तोवर परिसरातील नागरिक पेट घेतलेल्या वाहनांची आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते. अपघाताच्या प्रकरणाचा पुढील तपास आसेगावचे ठाणेदार किशोर तावडे यांच्या नेतृत्वात मोहन टोम्पे, नंदकिशोर बाकल, सागर डोंगरे करीत आहेत.

Web Title: Minor killed in pickup-scooter accident