अल्पवयीन मुलीवर वडील, थोरल्या भावाकडून वारंवार बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 05:14 AM2020-01-28T05:14:58+5:302020-01-28T05:15:11+5:30

१७ वर्षीय पीडिताच्या आईचे दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले.

A minor girl is repeatedly raped by a father, older brother | अल्पवयीन मुलीवर वडील, थोरल्या भावाकडून वारंवार बलात्कार

अल्पवयीन मुलीवर वडील, थोरल्या भावाकडून वारंवार बलात्कार

Next

अमरावती : जन्मदाते वडील, रक्षणाची जबाबदारी असलेला थोरला भाऊ व काका (मावशीचा नवरा) यांनी एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना अमरावती जिल्ह्यातील एका शहरात सोमवारी उघड झाली. याप्रकरणी पोलिसांनी पीडिताचे वडील, भाऊ, काका व मावशीविरुद्ध गुन्हा नोंदविला. वडील आणि भावाला अटक करण्यात आली असून, इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस सूत्रानुसार, १७ वर्षीय पीडिताच्या आईचे दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. दरम्यान, ८ एप्रिल २०१८ रोजी पीडितेवर वडिलाने पाशवी बलात्कार केला. ती रडली. वडील असून असे कसे करू शकता, असा सवाल केला. परंतु, पाषाणहृदयी बापाला पाझर फुटला नाही. त्याने पुन्हा अत्याचार केला. पीडिताने लगतच्या तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या मावशी आणि तिच्या पतीला आपबीती सांगितली. त्यांनी तिला बोलावून घेतले. मावशीकडे राहत असतानाच मावशीच्या पतीने (काका) तिच्यावर बलात्कार केला. ही बाब पीडिताने मावशीला सांगितली. हा प्रकार वारंवार सुरू होता. मुलीचे मानसिक संतुलन ठीक नाही. तिला औषधी सुरू आहेत, असा अपप्रचार मावशीने आजूबाजूला केला. त्यामुळे शेजारी-पाजारी सांगण्याचा प्रयत्न पीडिताने केला, पण व्यर्थ! पीडिता नाइलाजाने पुन्हा वडिलांकडे परतली. पण, भावानेही लहान बहिणीवर बलात्कार केला.
तिने २६ जानेवारी रोजी जिल्ह्यातील एका तालुका मुख्यालयातील पोलीस ठाणे गाठले. तेथे महिला सहायक पोलीस निरीक्षकाने तिची आपबीती ऐकून घेतली. तिला धीर दिला. विश्वासात घेऊन संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. प्राथमिक चौकशी व खातरजमा केल्यानंतर, सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडिताच्या तक्रारीवरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वडील व भावाला सोमवारी अटक करण्यात आली. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.
- हरी बालाजी एन., जिल्हा पोलीस अधीक्षक, अमरावती

Web Title: A minor girl is repeatedly raped by a father, older brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.