शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
4
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
6
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
7
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
8
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
9
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
10
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
11
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
12
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
13
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
14
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
15
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
16
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
17
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
18
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
19
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
20
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत कोट्यवधीची वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 06:00 IST

वनतस्करांनी ही अवैध वृक्षतोड करण्यापूर्वी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने खंडुखेडा राखीव जंगलाची रेकी केली. त्या ठिकाणी सागवान उपलब्ध असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी जंगलात राहुटी लावून रात्रीच्या मुक्कामाला नियोजनबद्ध वृक्षतोड घडवून आणली. वृक्षतोडीनंतर त्या लाकडावर उपचार करून त्याची त्यांनी चरपटे तयार करवून घेतली.

ठळक मुद्देखंडुखेड्यात सागवान झाडे तोडली : मध्य प्रदेशातील वनतस्करांचा महाराष्ट्रात हैदोस

परतवाडा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना वन्यजीव विभागातील जारिदा वनपरिक्षेत्रातील खंडुखेडा वर्तुळात स्थानिकांच्या मदतीने परप्रांतीय वनतस्करांनी दीडशे ते दोनशे सागवान वृक्षांची कत्तल केली.
वनतस्करांनी ही अवैध वृक्षतोड करण्यापूर्वी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने खंडुखेडा राखीव जंगलाची रेकी केली. त्या ठिकाणी सागवान उपलब्ध असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी जंगलात राहुटी लावून रात्रीच्या मुक्कामाला नियोजनबद्ध वृक्षतोड घडवून आणली. वृक्षतोडीनंतर त्या लाकडावर उपचार करून त्याची त्यांनी चरपटे तयार करवून घेतली.
दरम्यान, खंडुखेडा राखीव जंगलात तयार माल (लाकूड) घेऊन जाण्याकरिता वाहन नेमके कुठे लावायचं आणि कुठून काढायचे, याची पाहणी करण्यासाठी एम.पी. ४८ सी ४६१५ क्रमांकाच्या कारने दाखल झालेले वनतस्कर वनकर्मचाऱ्यांच्या नजरेत भरली. राखीव जंगली भागात फिरणाºया कारवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. जंगलात ७२ तास घालवून वनकर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले. सध्या हे आरोपी तुरुंगात आहेत. एक मोबाइल व कार वन्यजीव विभागाच्या ताब्यात आहे. राखीव जंगलात एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
सिपना वन्यजीव विभागाने याप्रकरणी मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील आठ आरोपींसह खंडुखेडा येथील स्थानिक रहिवाशाला अटक केली. एक जण फरार असून, आरोपींच्या मोबाइलचे सीडीआर मागविण्यात आला. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सेमाडोह-जव्हारकुंड क्षेत्रात व हरिसाल वनपरिक्षेत्रातही मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड असल्याची माहिती आहे.
दरम्यान, धाना बीटमधील वनखंड क्रमांक ३०३ मध्ये २३ सागवान वृक्षांची वनतस्करांनी अवैध कत्तल केली. वनतस्करांना रंगेहाथ पकडले. वनतस्करांनी प्रादेशिकमध्येही वृक्षतोड केल्याचे सिपना वन्यजीव विभाग (परतवाडा) येथील उपवनसंरक्षक शिवाबाला एस. यांनी दिली.

टॅग्स :forest departmentवनविभाग