​पैशांच्या वादातून मध्यरात्री राडा! अमरावतीत तरुणाचा चाकूने भोसकून खून; गुन्हे शाखेने काही तासांतच आरोपींना ठोकल्या बेड्या

By प्रदीप भाकरे | Updated: May 11, 2026 10:42 IST2026-05-11T10:42:15+5:302026-05-11T10:42:36+5:30

Amravati Crime News:​ अमरावती शहरात पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शुक्रवार बाजार परिसरात रविवारी मध्यरात्री हे हत्याकांड घडले.

Midnight brawl over money dispute! Youth stabbed to death in Amravati; Crime Branch arrests accused within hours | ​पैशांच्या वादातून मध्यरात्री राडा! अमरावतीत तरुणाचा चाकूने भोसकून खून; गुन्हे शाखेने काही तासांतच आरोपींना ठोकल्या बेड्या

​पैशांच्या वादातून मध्यरात्री राडा! अमरावतीत तरुणाचा चाकूने भोसकून खून; गुन्हे शाखेने काही तासांतच आरोपींना ठोकल्या बेड्या

- प्रदीप भाकरे 
अमरावती - शहरात पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शुक्रवार बाजार परिसरात रविवारी मध्यरात्री हे हत्याकांड घडले. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेने अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या काही तासांतच दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद नाझीम सय्यद सालार (रा. शुक्रवार बाजार) हा रविवारी रात्री १० मे रोजी आपल्या चुलत भावासोबत आणि मित्रासोबत परिसरात फिरत होता. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास नाझीमचा निशांत भोवते नामक व्यक्तीशी फोनवर पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला. नाझीम त्याला भेटण्यासाठी मदीना मांडा सेंटर जवळील गल्लीत गेला असता, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या निशांत भोवते आणि त्याचा मित्र यशराज कोरी यांनी नाझीमवर चाकूने सपासप वार केले.

​नाझीमच्या गळ्यावर, ओठावर आणि कपाळावर गंभीर वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. आरडाओरडा झाल्यामुळे आरोपींनी तिथून पळ काढला. जखमी नाझीमला तातडीने इर्विन रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा ॲक्शन मोडमध्ये आली. गुन्हे शाखाप्रमुख संदीप चव्हाण व त्यांच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांच्या आधारे आरोपींचा माग काढला. ११ मे रोजी पहाटेच्या सुमारास सापळा रचून निशांत भोवते आणि यशराज कोरी या दोन्ही मुख्य आरोपींना अटक करण्यात आली. शेख तौसीफ यांच्या जबानी रिपोर्टवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title : पैसों के विवाद में हत्या: अमरावती में युवक की चाकू मारकर हत्या, आरोपी गिरफ्तार

Web Summary : अमरावती में पैसों के विवाद में एक युवक की चाकू मारकर हत्या कर दी गई। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए फ्रेजरपुरा में अपराध के कुछ ही घंटों के भीतर दोनों आरोपियों, निशांत भोवते और यशराज कोरी को गिरफ्तार कर लिया।

Web Title : Money Dispute Turns Deadly: Youth Stabbed in Amravati, Killers Arrested

Web Summary : In Amravati, a money dispute led to the stabbing death of a youth. Police swiftly arrested the two accused, Nishant Bhovate and Yashraj Kori, within hours of the crime in Frazerpura.