शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘मामी, आण ना अलकेशला !’

By admin | Updated: October 7, 2015 01:23 IST

‘अलकेश..असे का केलेस रे..’, ‘परत ये रे माझ्या भावा..’ ‘मामी तू म्हणाली होतीस ना, अलकेशला आणेल म्हणून, आण ना आता त्याला..’ ..

बहिणीचा हृदयद्रावक आक्रोश : गहिवरले गुलाबबाबानगर, अनेक प्रश्न अनुत्तरितचअमरावती : ‘अलकेश..असे का केलेस रे..’, ‘परत ये रे माझ्या भावा..’ ‘मामी तू म्हणाली होतीस ना, अलकेशला आणेल म्हणून, आण ना आता त्याला..’ अलकेशच्या थोरल्या बहिणीचा हा विदारक आक्रोश बघ्यांच्या अंगावर शहारे आणत होता. शेजाऱ्यांच्या डोळ्यांमधील अश्रू थांबता थांबत नव्हते. नातलग त्यांच्या परीने या मायलेकींची समजूत घालीत असले तरी घराचे चैतन्य असलेला अलकेश आता कधीच परतणार नाही, ही जाणीव त्यांच्या आक्रोशात भर घालीत होती. अलकेश गेला. पण, अनेक प्रश्न मागे उरलेत. अभ्यासात तल्लख अलकेशने असा टोकाचा निर्णय का घेतला? समाजमन सुन्न करणाऱ्या घटनेसाठी नेमके जबाबदार कोण? दारिद्र्य की कमकुवत मानसिकता. हा प्रश्नही उरला आहेच. शहरातील गरिबांची वस्ती म्हणजे गुलाबबाबा नगर. येथे रामेश्वर मोहोड यांचे झोपडीवजा घर आहे. आचाऱ्याचे काम करुन ते कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पदरी दोन मुले. दहावीत विकास विद्यालयात शिकणारी नंदिनी आणि १३ वर्षांचा अलकेश. रामेश्वर मोहोड यांचा संसार कसाबसा चाललेला. अलकेश अभ्यासात तल्लख. नियमित शाळेत जाणारा. शिक्षकांचा आणि सवंगड्यांचाही लाडका. परिस्थितीने आलेले शहाणपण त्याच्याही अंगी होते. पण, सोमवारी काय झाले कुणास ठाऊक? आईने दहा रूपये दिले नाहीत आणि एक धपाटा मारला म्हणून अलकेशने चक्क आत्महत्या केली. अलकेश गेला, हे सत्य अद्यापही कुटुंबीयांच्या पचनी पडत नाही. मुख्याध्यापक, त्याला शिकविणारे शिक्षक आणि मित्र या धक्क्यातून अद्याप सावरलेले नाहीत. विविध चर्चांना ऊत अमरावती : सगळ्यांनाच अनेक प्रश्न पडलेत. पण, उत्तर मात्र कुणाकडेच नाही. पैसे देण्यास आईने नकार दिल्यानंतर रडत-रडत घराबाहेर गेलेला अलकेश शाळेच्या आवारात जाऊन आत्महत्या करेल, अशी पुसटशी कल्पनाही कोणालाच नव्हती. आईचा मार किंवा पैसे देण्यास मिळालेला नकार एवढा जिव्हारी लागेल, असेही कोणाला वाटले नव्हते. त्याची त्यावेळची नेमकी मनोवस्था काय होती?, आत्महत्येचे विचार आधीपासूनच त्याच्या मनात पिंगा घालत होते की काय?, त्याला नेमके शल्य कशाचे होते? अशा अनेक विषयांवर त्याचे नातलग आता चर्चा करीत आहेत. शाळेतही हाच विषय चर्चेला आहे. अलकेशसारखा अद्याप मिसरूडही न फुटलेला चिमुरडा आत्महत्येच्या निर्णयाप्रत जातो म्हणजे नेमके चुकले कुणाचे? हा प्रश्न जागरूक नागरिकांना नक्कीच बोचणारा असेल.