शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: March 10, 2016 00:28 IST

शेतकरी सर्वच बाजूने अडचणीत आला असताना त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन प्रयत्न करीत नाही. जिल्ह्यात दुष्काळाचे संकट ओढवले आहे.

यशोमती ठाकूर : मतदारसंघात विकासकामे सुरुतिवसा : शेतकरी सर्वच बाजूने अडचणीत आला असताना त्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी शासन प्रयत्न करीत नाही. जिल्ह्यात दुष्काळाचे संकट ओढवले आहे. परंतु अद्याप जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला नाही. त्यामुळे शासनाने केलेल्या घोषणा व त्यांची अंमलबजावणी यामध्ये कोणताही ताळमेळ नाही. घोषणांच्या अतिवृष्टीत सरकारही वाहून गेल्याची टीका आ. यशोमती ठाकूर यांनी केली. त्या कठोरा गांधी येथील जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमी मार्गाच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजनप्रसंगी बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर विनोद डांगे, जि.प. सदस्य, बाळासाहेब देशमुख, हरीश मोरे, वीरेंद्र जाधव, गजानन जवंजाळ उपस्थित होते. यावेळी यशोमती ठाकूर यांनी आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत कठोरा गांधी या गावाची निवड केल्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत येथे शैक्षणिक व इतर सुविधा निर्माण करण्यात येतील, असे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, सध्या जे सत्तेत आहेत त्यांनी केवळ धर्माच्या नावावर राजकारण सुरू केले आहे. धर्माबाबत ‘हम करे सो कायदा’ अशी नीती त्यांनी अवलंबली आहे. मात्र, घटनेने सर्वांना समसमान अधिकार बहाल केले असून कोणी कोणत्या धर्माची आराधना करावी, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. याबाबत कोणीही बळजबरी करू शकत नाही. शेतकरी, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जैसे थे असताना सत्तेत असलेल्या पक्षाचे नेते मात्र जात, धर्माला महत्त्व देत आहेत. त्यामुळे या सरकारकडून अपेक्षा ठेवण्यात काहीही अर्थ नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी परिसरातील अनेक ग्रामस्थ, मान्यवरांची उपस्थिती होती. आपणच आपल्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे, असा सल्ला यावेळी आ. यशोमतींनी दिला. (प्रतिनिधी)