​ट्रान्सपोर्ट नगरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 'अजहर चायना'सह दोघे पिस्टल आणि चाकूंसह गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 00:29 IST2026-04-27T00:29:13+5:302026-04-27T00:29:25+5:30

गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Major action by Crime Branch in Transport Nagar; Two including 'Azhar China' arrested with pistols and knives | ​ट्रान्सपोर्ट नगरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 'अजहर चायना'सह दोघे पिस्टल आणि चाकूंसह गजाआड

​ट्रान्सपोर्ट नगरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 'अजहर चायना'सह दोघे पिस्टल आणि चाकूंसह गजाआड

​अमरावती : शहरातील नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या ट्रान्सपोर्ट नगर परिसरात आज गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन सराईत गुन्हेगारांना शस्त्रांसह रंगेहात पकडले. गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

​मिळालेल्या माहितीनुसार, आज २६ एप्रिल २०२६ रोजी ट्रान्सपोर्ट नगर परिसरात दोन इसम संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पथकाने सापळा रचून अजहर खान जुरावर खान ऊर्फ अजहर चायना (वय ३०, रा. पठाण चौक) आणि अब्दुल नफिज अब्दुल हफिज (वय ३२, रा. रहमत नगर) या दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या झडतीमध्ये आरोपी अजहर खान याच्याकडून एक पिस्टल (मॅगझिनसह) आणि एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आले. तर दुसरा आरोपी अब्दुल नफिज याच्याकडून एक लोखंडी कुकरी आणि एक फोल्डिंगचा चायना चाकू हस्तगत करण्यात आला आहे.

​पोलिसांनी या कारवाईत एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोन्ही आरोपींविरुद्ध नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title : अमरावती: ट्रांसपोर्ट नगर में अपराध शाखा ने दो को पिस्तौल, चाकू के साथ पकड़ा

Web Summary : अमरावती अपराध शाखा ने ट्रांसपोर्ट नगर में अजहर चाइना और अब्दुल नाफी नामक दो कुख्यात अपराधियों को गिरफ्तार किया। पुलिस ने एक पिस्तौल, जिंदा कारतूस और चाकू जब्त किए। जब्त वस्तुओं की कुल कीमत ₹29,000 है। मामला दर्ज किया गया है।

Web Title : Amravati: Crime Branch Busts Two with Pistols, Knives in Transport Nagar

Web Summary : Amravati Crime Branch arrested two notorious criminals, Azhar China and Abdul Nafi, in Transport Nagar. Police seized a pistol, live cartridge, and knives. The total seized items are worth ₹29,000. A case has been registered.