Maharashtra Election 2019 ; प्रहारचे राज्यात ३० उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 06:00 AM2019-10-07T06:00:00+5:302019-10-07T06:00:57+5:30

अचलपूर मतदारसंघातून स्वत: बच्चू कडू, मेळघाट मतदारसंघातून राजकुमार पटेल, राळेगाव (यवतमाळ) मतदारसंघातून गुलाबराव पनरे, उत्तर नांदेड मतदारसंघातून संदीप पांडे, रामटेक मतदारसंघातून रमेश कारामोरे, मंगरूळपीर (जि. वाशिम) मतदारसंघातून संतोष संगत, हिंगोली मतदारसंघातून विजय राऊत, देवळी मतदारसंघातून राजेश सावरकर, तिवसा मतदारसंघातून छोटू महाराज वसू यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

Maharashtra Election 2019 ; 30 candidates in the state of prahar | Maharashtra Election 2019 ; प्रहारचे राज्यात ३० उमेदवार

Maharashtra Election 2019 ; प्रहारचे राज्यात ३० उमेदवार

Next
ठळक मुद्देबच्चू कडू : कुठल्याही पक्षाशी युती नाही, पत्रपरिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : यंदाची विधानसभा निवडणूक प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर लढणार आहे. प्रहारची कुठल्याही पक्षाशी युती नाही. राज्यात आमच्या पक्षाने ३० उमेदवार दिले असल्याची माहिती अपक्ष आमदार व प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी दिली. मेळघाटातील माजी आमदार राजकुमार पटेल यांनी प्रहार पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अचलपूर मतदारसंघातून स्वत: बच्चू कडू, मेळघाट मतदारसंघातून राजकुमार पटेल, राळेगाव (यवतमाळ) मतदारसंघातून गुलाबराव पनरे, उत्तर नांदेड मतदारसंघातून संदीप पांडे, रामटेक मतदारसंघातून रमेश कारामोरे, मंगरूळपीर (जि. वाशिम) मतदारसंघातून संतोष संगत, हिंगोली मतदारसंघातून विजय राऊत, देवळी मतदारसंघातून राजेश सावरकर, तिवसा मतदारसंघातून छोटू महाराज वसू यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.
नालासोपारा मतदारसंघातून हितेश जाधव, श्रीगोंदा मतदारसंघातून विनोदसिंह परदेशी, बीड मतदारसंघातून खालेद सलीम, कारंजा मतदारसंघातून मनीष मोडक, काटोल मतदारसंघातून प्रदीप उबाळे, चेंबूर मतदारसंघातून संतोष सांजकर, वरळी मतदारसंघातून प्रताप देसाई, फुलंब्री मतदारसंघातून सुधाकर शिंदे, पैठण मतदारसंघातून जयाजीराव सूर्यवंशी, दौंड मतदारसंघातून रमेश शितोळे, औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून प्रदीप त्रिभुवन, सिल्लोड सायगाव मतदारसंघातून अनिल पालोदे, वैजापूर मतदारसंघातून ज्ञानेश्वर घोळके, औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून शिवप्रसाद पगार, मूर्तिजापूर मतदारसंघातून राजकुमार नाचणे, सिन्नर मतदारसंघातून शरद शिंदे, तुळजापूर मतदारसंघातून महेंद्र दुरगुडे आणि चांदवड-देवडा मतदारसंघातून राजेंद्र देवरे हे उमेदवार रिंगणात असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी पत्रकारांना दिली. यावेळी प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी अचलपूर मतदारसंघातून आमदारकीची हॅट्ट्रिक पूर्ण केली असून, ते चौथ्यांदा विजय मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Web Title: Maharashtra Election 2019 ; 30 candidates in the state of prahar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.