शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदाराच्या निष्क्रियतेमुळे रखडला निम्नसाखळी प्रकल्प

By admin | Updated: October 26, 2015 00:40 IST

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजे सालोड येथील निम्नसाखळी सिंचन प्रकल्पाचे काम ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अतिशय संथगतीने सुरू आहे.

काम संथगतीने : मूळ किंमत वाढल्याने कंत्राटदाराचा फायदा मनीष कहाते  वाढोणा रामनाथनांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजे सालोड येथील निम्नसाखळी सिंचन प्रकल्पाचे काम ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या मूळ किमतीत वाढ होऊन त्याचा अप्रत्यक्ष फायदा संबंधित ठेकेदाराला होणार आहे. सुमारे ३०० हेक्टर जमीन प्रकल्पाकरिता लागणार आहे. त्यापैकी सर्वप्रथम हरणी आणि आमडापूर येथील १५ हेक्टर जमीन तत्काळ प्रकल्पाकरिता लागणार आहे. जमीन उपलब्ध आहे. निधीची कमतरता नाही. केवळ काळी माती उपलब्ध नाही. ती आणण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. माती नसल्याने काम रखडले आहे. त्यातच रोज बांधकामाच्या विविध साहित्याच्या किंमती वाढतीवर आहे त्यामुळे जेवढे जास्त कालावधी बांधकामाला प्रत्यक्षात लागणार तेवढा जास्त फायदा कंत्राटदाराचा होणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या किमती ठरल्या आहेत. जलसंपदा विभागाकडून पूर्ण हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे. मात्र कंत्राटदार आपला खिसा कसा भरता येईल, याकडे लक्ष देत आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. केव्हा धरण पूर्ण होणार आणि केव्हा बारमाही ओलीताची पिके असे स्वप्न शेतकरी पाहात आहे. या धरणाचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.