शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:01 IST

कोरोनाच्या महामारीमुळे देशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित असल्याने संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरू केली. प्रतिक्विंटल ५ हजार ५०० रुपये दराने कापूस खरेदी सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हातात कापसाचे पैसे मिळण्यास महिनाभराचा कालावधी लागतो. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी शासकीय केंद्रावर विक्री न करता व्यापाऱ्यांना कापूस विकणे पसंत करीत आहेत

ठळक मुद्देहमीपेक्षा एक हजारांनी कमी दर : खरेदी केंद्रावर नोंदणी; प्रतीक्षा कायम

कैलास ठाकूर।लोकमत न्यूज नेटवर्कलेहगाव : कापसाच्या दरात दिवसेंदिवस चढ-उतार होत असल्याने त्याची विक्री करावी की काही दिवस साठवून ठेवावा, असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.कोरोनाच्या महामारीमुळे देशात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित असल्याने संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरू केली. प्रतिक्विंटल ५ हजार ५०० रुपये दराने कापूस खरेदी सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हातात कापसाचे पैसे मिळण्यास महिनाभराचा कालावधी लागतो. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी शासकीय केंद्रावर विक्री न करता व्यापाऱ्यांना कापूस विकणे पसंत करीत आहेत. हीच संधी साधून व्यापारी तो कापूस प्रतिक्विंटल ४ हजार ३०० रुपये दराने खरेदी करीत आहेत. एकंदर कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यापारी लूट करीत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.शासकीय खरेदी केंद्रावर कापूस विकायला प्रतीक्षा करावी लागत असल्याने परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. राज्य सरकारने कापूस खरेदी करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी झपाट्याने केली; मात्र आता खरेदी केंद्रावर गती मंदावली आहे. खासगी कापूस खरेदीदार हमीभावापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी करीत आहेत.हजारांचा तोटा हमखासखासगी बाजारात कापूस विकणे म्हणजे प्रतिक्विंटल एक हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे. त्यात लॉकडाऊनमध्ये शासकीय कापूस खरेदी केंद्र बंद होते. खूप दिवसांपासून नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. एकीकडे एका दिवशी नोंदणी शंभराहून अधिक झाली. मात्र, अर्ध्याहून कमी खरेदी झाल्याची स्थिती आहे.जेवढी नोंदणी, तेवढी खरेदी कराज्या तारखेला जेवढी नोंदणी झाली, तेवढ्यांकडून कापूस खरेदी झाली, तर कपाशीचे क्षेत्र वाढेल. पुढील महिन्यात पावसाळा सुरू होत असल्याने घरात कापूस पडून असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शासनाने पेरणीचे नियोजन केले असले तरी खत, बियाणे खरेदीची तरतूद शेतकऱ्यांकडून अद्याप झालेली नाही.

टॅग्स :cottonकापूसMarket Yardमार्केट यार्ड