शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

खासगी इंग्रजी शाळांकडून लूट

By admin | Updated: May 9, 2014 23:50 IST

अचलपूर अचलपूर-परतवाड्यासह तालुक्यात अनेक ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांचे पेव फुटले आहे.

सुनील देशपांडे - अचलपूर

अचलपूर-परतवाड्यासह तालुक्यात अनेक ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांचे पेव फुटले आहे. या शाळांमध्ये कार्यरत अनेक डी.एड., बी.एड. पात्रताधारक शिक्षक अत्यल्प मानधनावर कार्यरत आहेत. जुळ्या शहरात ३० पेक्षा अधिक इंग्रजी माध्यमांच्या शाळा असून त्यातील काहींना शिक्षण विभागाची मान्यतासुद्धा नाही. बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे अशा खासगी शाळांमध्ये अनेक तरूण-तरूणी अत्यल्प वेतनावर नोकर्‍या करतात. शिवाय या शाळांवर शिक्षण विभागाचा कोणताच अंकुश नसल्याने संस्थाचालक पालकांकडून भरमसाठ शुल्क आकारत आहेत. असे असूनही या शाळांमध्ये कार्यरत कर्मचार्‍यांना पुरेसे मानधन आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही. नियमबाह्य कामे करण्यास त्यांना बाध्य केले जाते. पालकांकडून भरमसाठ शुल्क आकारल्यानंतरही या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना पुरेशा सोई उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. त्यांच्यासाठी पाण्याची सोय देखील केली जात नाही. त्यामुळे पालकवर्ग सतत दबक्या आवाजात तक्रारी करीत असतात. (प्रतिनिधी) पाल्यांना इंग्रजी माध्यमात शिकविण्याच्या पालकांच्या अट्टाहासापायी या खासगी इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढत असली तरी तक्रारीही वाढत आहेत. अनेक शाळांंमध्ये तर विनापरवानगी अतिरिक्त तुकड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळांकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्यावर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही. या खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील अव्यवस्था दूर करण्याची मागणी केली जात आहे.