शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्राला आदिवासींनी ठोकले कुलूप

By admin | Updated: August 10, 2015 00:01 IST

मागील १५ दिवसांपासून एकमात्र महिला शिपाईच्या भरवशावर सुरू असलेल्या चाकर्दा येथील प्राथमिक उपकेंद्राला संतप्त गावकऱ्यांनी रविवारी सकाळी ९ वाजता कुलूप ठोकले.

रुग्ण वाऱ्यावर : महिला शिपाईच्या हस्ते औषधी वाटपधारणी : मागील १५ दिवसांपासून एकमात्र महिला शिपाईच्या भरवशावर सुरू असलेल्या चाकर्दा येथील प्राथमिक उपकेंद्राला संतप्त गावकऱ्यांनी रविवारी सकाळी ९ वाजता कुलूप ठोकले. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या आंदोलनात सरपंच, उपसरपंच, सदस्य व पोलीस पाटलांचा सहभाग असल्याने आरोग्य प्रशासनासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कळमखार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या चाकर्दा उपकेंद्र हे धारणीपासून १५ किमी अंतरावर आहे. येथे एक आरोग्य अधिकारी, २ परिचारिका आणि एक महिला शिपाई कार्यरत आहे. परंतु १५ दिवसांपासून केवळ महिला शिपायाच्या भरवशावर हे उपकेंद्र सुरू आहे. त्याचप्रमाणे येथे स्वतंत्र परिचारिकेचेही मुख्यालय असून यात प्रसूतीगृहाची इमारत बांधण्यात आली आहे. मात्र मुख्य आरोग्य कर्मचारी डॉक्टरांसह बेपत्ता असल्याने गावातील रुग्णांना आरोग्य सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. शनिवारी रात्री १२ वाजता गावातीलच शीला रमेश पोर्तेकर यांना प्रसव वेदना सुरू झाल्या. तिला प्रा. आ. उपकेंद्रात नेले. परंतु तेथेही डॉक्टर व कर्मचारी नसल्याने परत घरी आणले गेले. मदतीशिवाय तिचे बाळंतपण करण्यात आले. रविवारी पहाटे ही वार्ता कळताच गावकऱ्यांनी सरपंच सुंदरबाई ढिमरेकर, उपसरपंच, राम बेठेकर, नानकराम ढिमरेकर, परसराम बेठेकर, अशोक भालेराव आदींनी या उपकेंद्राला कुलूप ठोकले.