शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन; प्रदूषणात कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अडीच महिन्यांपासून ‘लॉकडाऊन’मुळे शहरात वाहनांची वर्दळ मंदावली. बांधकामे ठप्प झाली व उद्योगही बंद असल्याने ...

ठळक मुद्दे‘एएक्यूम’चा अहवाल : वाहनांची वर्दळ कमी, बांधकामे, उद्योग बंदचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अडीच महिन्यांपासून ‘लॉकडाऊन’मुळे शहरात वाहनांची वर्दळ मंदावली. बांधकामे ठप्प झाली व उद्योगही बंद असल्याने प्रदुषणात निम्याहून अधिक प्रमाणात कमी झाली आहे. व्यापारी क्षेत्रात ‘आएसपीएम’चे प्रमाण सरासरीने १११ ने कमी होऊन ५२ पर्यत आढळून आल्याचा प्रदुषण विभागाचा अहवाल आहे.औद्योगिक क्षेत्रात देखिल १८ व रहिवासी क्षेत्रात २३ पर्यत आढळून आले आहे. कोरोनाचे संकटात शहरातील नागरिकांचे वर्तणुकीमध्ये बदल झाला. वाहनांची वर्दळ कमी झाली. नागरिकांचे अवागमनात कमी झाल्याने पर्यावरणामध्ये सुधारणा झाली. यापुढेही आरोग्यासाठी पोषक वातावरण मिळावे, ‘लॉकडाऊन’ निवळल्यानंतरही अमरावतीकरांनी स्वंयस्फूर्तीने जनता कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण केल्यास शहराच्या पर्यावरण सुधारणेस उपयुक्त ठरु शकते. यासाठी आठवड्यातून एक दिवस कोणतेही वाहन न वापरणे, सार्वजनिक वाहनांनी प्रवास कमी करणे, एकाच वाहनांनी अधिक व्यक्तींनी प्रवास करणे, उद्योग, व्यवसाय बंद ठेवणे अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडणे आदी बाबींचा सकारात्मक परिणाम व शहराचे पर्यावरण सुधारणेसाठी होवू शकतो, असे महापालिकेचे पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांनी सांगितले.शहराचे क्षेत्रफळ १२१.६५ चौ.की.मी. व लोकसंख्या आठ लाख आहे. शहराची वाटचाल विकासाकडे होत असताना विकासात्मक कामे रात्रंदिवस सुरु आहे. या कामांमुळे होणारी धुळ, कचरा जाळणे, वाहनांमधून निघणारा धूर आदींमुळे हवाप्रदुषण होत आहे. शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत अ‍ॅबिएंट एअर क्वॉलिटी मॉनिटरींग ( एएक्यूएम) या संस्थेद्वारा प्राप्त आकडेवारीकरुन एनओटूचे प्रमाण १३.०५ व एसओटूचे प्रमाण ११.१८ आढळले. हे प्रमाण प्रदुषण पातळीचे ८० पेक्षा कमी आहे व आरएसपीएमचे प्रमाण ८५.८३ म्हणजेच अनुज्ञेय पातळीतच आढळून आल्याचे देशमुख यांनी सांगितले.महापालिका क्षेत्रात ५३१ शांतता क्षेत्रदिवसेंदिवस वाढणारे नागरीकरण, वाहनांची संख्या, डिजे संस्कृतीचे वाढते प्रमाण यामुळे शहरातील प्रदूषण पातळीमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. ध्वनी प्रदुषणामुळे मानवी आरोग्यावर शारीरिक व मानसिक दुष्परीणाम होतात ही बाब निष्पन्न झाली आहे. नागरी क्षेत्रावर होणारे ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील शैक्षणिक संस्था, दवाखाने, न्यायालय यासभोवती १०० मिटरचा परिसर असे एकूण ५८१ शांतता क्षेत्र महापालिका क्षेत्रामध्ये घोषित करण्यात आलेले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याenvironmentपर्यावरण