शहरं
Join us  
Trending Stories
1
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
2
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
3
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
4
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
5
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
6
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
7
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
8
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
9
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
10
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
11
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
12
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
13
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
14
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
17
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
20
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
Daily Top 2Weekly Top 5

रेशन कार्डवरही मिळणार जीवनदायीचा लाभ

By admin | Updated: May 10, 2014 01:14 IST

आर्थिक दुर्बल कुटुंबांना दज्रेदार आरोग्यसेवा देण्यासाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. याचा लाभ घेण्याकरिता जीवनदायी कार्डचे वाटप करण्यात आले;

अमरावती : आर्थिक दुर्बल कुटुंबांना दज्रेदार आरोग्यसेवा देण्यासाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. याचा लाभ घेण्याकरिता जीवनदायी कार्डचे वाटप करण्यात आले; मात्र माहिती अपडेट न होऊ शकल्याने अनेकांना कार्ड मिळाले नाहीत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यावर उपाय म्हणून आता रेशनकार्ड व आधारकार्डवरही योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना दज्रेदार आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने २१ नोव्हेंबर २0१२ पासून शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना लागू केली. या योजनेंतर्गत ९७१ प्रकारच्या शस्त्रक्रिया, औषधोपचार व १२१ तपासणी उपचारांचा लाभ घेता येणार आहे. जीवनदायी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबांना कार्ड वाटप करण्यात आले. या माहितीसाठी शिधापत्रिकेची माहिती ग्राह्य धरण्यात आली. मात्र, संबंधित विभागाने अशा कार्डधारकांची माहिती अपडेट केली नाही. ज्या कुटुंबांचा डेटा अपडेट केला; त्यातही मेळ नसल्याचे समोर आले. एका कुटुंबातील नावे दुसर्‍याच कुटुंबात गेल्याचे निदर्शनास आले. या कारणाने अनेकांना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. याची दखल घेऊन शासनाने शिधापत्रिका व आधारकार्ड असतानाही योजनेचा लाभ देण्याच्या सूचना संबंधित कंपनी व जिल्हय़ातील रुग्णसेवा देणार्‍या रुग्णालयांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे आता रेशनकार्डधारकांनादेखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. मात्र शिधापत्रिकेवर नोंदणीची तारीख असणे बंधनकारक आहे. ती नसल्यास तहसील कार्यालयात जाऊन तारीख नोंदवून घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.