शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

गढूळ पाणी शुद्ध करण्यास जीवन प्राधिकरण अपयशी

By admin | Updated: August 12, 2015 00:10 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुन्हा गढूळ पाण्याचा पुरवठा सुरु झाल्याने लाखो अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तुरटी, क्लोरीनचे डोज वाढविले : शहरात सर्वत्र दूषित पाण्याचा पुरवठावैभव बाबरेकर अमरावतीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुन्हा गढूळ पाण्याचा पुरवठा सुरु झाल्याने लाखो अमरावतीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील सर्वच परिसरात गढूळ पाणी पुरवठ्यामुळे पोटाचे विकार वाढल्याची ओरड नागरिकांमध्ये सुरु झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात धरणातील पाण्याची पातळी वाढली असून जीवन प्राधीकरण गढूळ पाणी शुध्द करण्यात उपयशी ठरले आहेत. हे वास्तव आजच्या स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या अमरावती शहराचे आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही तीच स्थिती उदभवली असून पुन्हा जीवन प्राधिकरणाकडून गढूळ पाणीपुरवठा सुरु झाला आहे. गढूळ पाण्याबाबत तक्रारी घेऊन अनेकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे दारे ठोठावली आहेत. मात्र, पाण्यात गढूळता नसून पाण्याचा केवळ रंग गढूळ दिसत असल्याची अफलातून उत्तरे जीवन प्राधिकरणाचे अधिकारी देत आहे. गढूळ पाण्याबाबत 'लोकमत' प्रतिनिधीने काही डॉक्टर व तज्ज्ञ मंडळीशी चर्चा केली आहे. त्यांनाही गढूळ पाणी असो किंवा गढूळ रंग असो, दोन्ही स्थितीतील पाणी मानवी शरीररासाठी घातक असल्याचे सांगण्यात आले आहे. शहराची लोकसंख्या ८ ते १० लाखांच्या जवळपास आहे. शहरात जीवन प्राधिकरणाचे सुमारे ८० हजार ग्रांहक आहेत. दररोज नागरिकांना ९५ दशलशलिटरचा पाणीपुरवठा होत आहे. मात्र, शुध्द पाणीपुरवठ्याची हमी देणारे जीवन प्राधीकरण आजच्या आधूनिक युगात पाण्यातील गढूळताही नाहिसी करू शकत नाहीत, ही बाब आश्चर्याचीच आहे. शहरात दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच आहेत. त्यातच जीवन प्राधीकरणाकडूनही गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने पोटाचे विकार वाढण्याची शक्यता आहे. गढूळ पाण्यात हायड्राआॅक्साईड व आयरन बॅक्टेरियाविविध ठिकाणच्या पाण्यासोबत रासायनीक खतातील रसायन वाहत येऊन पाणी धरणात जमा होते. त्यामध्ये असलेल्या सल्फेट रसायनापासून हायड्राआॅक्साईड तयार होते. ते लवकर स्थिर होत नाही. त्यातच पाण्यात आयरन बॅक्टेरियाचे प्रमाण वाढते. ते मानवी शरिरासाठी घातक ठरते. धरणातील पाण्याचे शुध्दीकरण केल्यावरही हायड्राआक्साईड व आयरन बॅक्टेरियाचे काही प्रमाण कायमच असते. त्यामुळेच पाण्याचा रंग गढूळ होते. मात्र, पाण्यात गढूळता अधिक असल्यास पोटाचे विकार होण्याची दाट शक्यता असते, अशी माहिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख आ.श.अस्वार यांनी दिली. गढूळ पाणी घेऊन नागरिकांची मजीप्राकडे धावशहरातील बहूतांश भागात नळाला गढूळ पाणी येत असल्यामुळे अनेक नागरिक गढूळ पाणी घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या दारे ठोठावत आहेत. मात्र, पाण्याला केवळ गढूळ रंग आहे, तो गढूळ रंग नाहिसा केला जावू शकत नाही, असे उत्तरे नागरिकांना देण्यात येत आहे. मंगळवारी भाजीबाजार परिसरातील विशाल गणोरकर यांनी बॉटलीत गढूळ पाणी घेऊन मजीप्रा अधिकाऱ्यांना विचारणा केली. त्यांनी आणलेल्या पाण्यात गढूळतेचे प्रमाण अधिक होते.