शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चार प्रकल्पांनी गाठली धोक्याची पातळी

By admin | Updated: July 28, 2014 23:16 IST

विभागातील सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या उर्ध्व वर्धा धरणाचे क्षेत्रात दि. २२, २३ व २७ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडला तसेच प्रकल्पात मध्यप्रदेशातून ‘येवा’ वाढल्याने जलाशयातील साठ्याने धोक्याची

अमरावती : विभागातील सर्वात मोठा प्रकल्प असणाऱ्या उर्ध्व वर्धा धरणाचे क्षेत्रात दि. २२, २३ व २७ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडला तसेच प्रकल्पात मध्यप्रदेशातून ‘येवा’ वाढल्याने जलाशयातील साठ्याने धोक्याची पातळी गाठली. त्यामुळे रविवारपासून धरणाचे १३ ही दरवाजे उघडण्यात आले. तसेच चांदूरबाजार तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने पूर्णा, चंद्रभागा व सपन प्रकल्पदेखील ‘ओव्हरफ्लो’ झाले आहेत.या धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहे. झालेली अतिवृष्टी, सोडण्यात आलेले धरणाचे पाणी यामुळे जिल्ह्यातील ३० ते ४० गावात पुराचे पाणी घुसल्याने ४ हजारावर नागरिकांना सुरक्षित स्थळी बाहेर काढण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात १ मोठा उर्ध्व वर्धा, ४ मध्यम शहानूर, चंद्रभागा, पूर्णा व सपन तसेच ११८ मध्यम प्रकल्प आहेत. उर्ध्व वर्धा धरणाचे पाण्यासाठी प्रमुख स्त्रोत मध्यप्रदेशातून येतो. २२, २३ व २७ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडल्याने धरणाने ३४२.०४ ही महत्तम पाण्याची पातळी गाठली. परिणामी रविवार २७ जुलै रोजी दुपारी १२.३० मिनिटांनी धरणाचे तेराही दरवाजे उघडण्यात आले. यामुळे वर्धा नदीला पूर येऊन धामणगाव तालुक्यामधील बगाजी सागर धरण धोक्याच्या पातळीवर आले. चांदूरबाजार तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने पूर्णा व चंद्रभागा धरणाने धोक्याची पातळी गाठली. यामुळे ४ हजारावर लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.