शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

उपवनसंरक्षकांच्या बंगल्यातील झाडावर बिबट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 05:00 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत गुगामल, सिपना, अकोट या वन्यजीव विभागातील अतिसंरक्षित घनदाट जंगलात जंगल सफारी सुरू आहे. यादरम्यान चिखलदरा येथील अप्पर प्लेटो स्थित गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या शासकीय निवासस्थानात असलेल्या झाडांवर शुक्रवारी रात्री बिबट्याने ठाण मांडले होते. उपवनसंरक्षक व कर्मचाऱ्यांना तो बिबट दिसला. त्यांनी या घटनेची नोंद घेतली.

ठळक मुद्देपर्यटकांना वाघाचे दर्शन

नरेंद्र जावरेलोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळासह अतिसंरक्षित  मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना आता वाघ आणि बिबट्याचे दर्शनही होऊ लागले आहे. शुक्रवारी रात्री  उपवनसंरक्षकांच्या शासकीय निवासस्थानातील झाडावर बिबट्याने ठाण मांडले. दुसरीकडे ढाकणा जंगल सफारीत पर्यटकांना दर्शन दिले, तर कुकुलदरा परिसरात पर्यटकांना दिवसा वाघाचे दर्शन झाले. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत गुगामल, सिपना, अकोट या वन्यजीव विभागातील अतिसंरक्षित घनदाट जंगलात जंगल सफारी सुरू आहे. यादरम्यान चिखलदरा येथील अप्पर प्लेटो स्थित गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या शासकीय निवासस्थानात असलेल्या झाडांवर शुक्रवारी रात्री बिबट्याने ठाण मांडले होते. उपवनसंरक्षक व कर्मचाऱ्यांना तो बिबट दिसला. त्यांनी या घटनेची नोंद घेतली.दुसरीकडे शनिवारी डोलार निसर्ग पर्यटन सफारीदरम्यान अमरावती येथील वन्यजीवप्रेमी पर्यटक आशिष वैभव यांना बिबट्याचे दर्शन झाले असल्याची माहिती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी दिली. मेळघाटातील वन्यप्राण्यांची विपुलता या घटनांनी पुढे आली आहे.

दोन भागात दिवसाच दिसला वाघ चिखलदरा शहर लोअर आणि अपर प्लेटो अशा दोन भागांत वसले आहे. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास स्थानिक नागरिक लोअर प्लेटोकडे येत असताना कुकुलदरा परिसरात वाघ जात असल्याचे दिसले. बघता-बघता तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. नागरिकांच्या आवाजाने वाघ तेथून निघून गेला.

टॅग्स :leopardबिबट्या