शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीत १.३ कोटींची कपात

By admin | Updated: March 26, 2017 00:12 IST

व्यापाऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने गाजावाजा करीत एलबीटी बंद केली व सोबतच भरीव अर्थसहायाची घोषणा केली होती.

आर्थिक गंडांतर : विकासकामांसाठी निधीची उभारणी कशी ?अमरावती : व्यापाऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने गाजावाजा करीत एलबीटी बंद केली व सोबतच भरीव अर्थसहायाची घोषणा केली होती. तथापि एलबीटी बंद करून दीड वर्षे उलटण्यापूर्वीच सरकारने या अनुदानात हात आखडता घेतला आहे. जानेवारी २०१७ पासून प्राप्त अनुदानात दरमहा तब्बल १.३ कोटी रूपयांची कपात झाली आहे. एकीकडे उत्पन्नाचा मार्ग बंद व दुसरीकडे राज्य सरकारची कपात यामुळे महापालिकेसमोर विकासकामांसाठी निधीची उभारणी करताना प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत.आतापर्यंत महापालिकेला एलबीटी सहायक अनुदान म्हणून महिन्याकाठी ७.२७ कोटी रूपये मिळायचे. मात्र, आता २८ फेब्रुवारीला महापालिकेच्या नावे केवळ ५.९७ कोटी रूपयेच आले आहेत. हे जानेवारी महिन्याचे अनुदान असून मार्च संपण्याच्या बेतात असताना अद्याप फेब्रुवारी महिन्याचे अनुदान आलेले नाही. जानेवारीप्रमाणे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या अनुदानात ७.२७ कोटींऐवजी ५.९७ कोटी रूपये आल्यास महापालिकेवर आर्थिक गंडांतर येणार आहे. आस्थापना खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार भागविताना मनपा प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहेत. सरकारच्या अनुदानावर महापालिकेची भिस्त असताना त्यातही कपात झाल्याने विविध कामांवर थेट परिणाम होणार आहे. (प्रतिनिधी)शासन निर्णयान्वये कपातराज्य शासनाने आॅगस्ट २०१५ पासून एलबीटी आकारणी बंद केली. त्यामुळे महापालिकेचा आर्थिक उत्पन्नाचा हक्काचा स्त्रोत आटल्याने प्रशासनाला अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहावे लागत आहे. दरमहा ७.२७ कोटींचे अनुदान दिल्यानंतर निश्चित रकमेपेक्षा ज्यादा अनुदान दिल्याचे सरकारच्या लक्षात आले. त्यांनी त्यानंतर सर्व महापालिकांना अनुदानात कपात करण्यात येत असल्याबाबत कळविले. अनुदान वाढविण्याची मागणीसरकारकडून एलबीटीच्या मोबदल्यात दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करावी, अशी मागणी महापालिकेने केली आहे. सन २०११ पासून जकात बंद झाली. ती सुरू असती तर महापालिकेचे वार्षिक उत्पन्न ११० ते १२० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले असते. महापालिकेच्या एकूण उत्पन्नापैकी एलबीटीचा वाटा जवळपास ३० टक्के होता. त्यामुळे प्रस्तावित दरवाढ लक्षात घेऊन एलबीटीचे सहायक अनुदान वाढवावे, अशी मागणी नगरविकास खात्याकडे नोंदविण्यात आली आहे.मुद्रांक शुल्क अधिभारापोटी २.२१ कोटीआर्थिक नादारीतून जाणाऱ्या महापालिकेला मुद्रांक शुल्क अधिभारापोटी २.२१ कोटी रूपये मिळाले आहेत. १ टक्का मुद्रांक शुल्क अधिभारामुळे जमा होणारी २११ कोटींची रक्कम संबंधित महापालिकेच्या खात्यात वितरित करण्यास नगरविकास विभागाने २३ मार्चला मान्यता दिली आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर १६ या कालावधीतील ही रक्कम आहे.