शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शाळेत ‘ई-लर्निंग’चा शुभारंभ

By admin | Updated: August 16, 2014 23:14 IST

गरीब परिस्थितीतील मुलामुलींना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मनपाच्या शाळा सुध्दा खाजगीच्या तुलनेत याव्यात व शाळांची पटसंख्या वाढावी या उद्देशाने नवनवीन शिक्षण पध्दतीव्दारा

अमरावती : गरीब परिस्थितीतील मुलामुलींना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मनपाच्या शाळा सुध्दा खाजगीच्या तुलनेत याव्यात व शाळांची पटसंख्या वाढावी या उद्देशाने नवनवीन शिक्षण पध्दतीव्दारा अध्यापन करता यावे या उद्देशाने नुकतेच मनपा शाळा नं. १४ वडाळी येथे महापौर वंदनाताई कंगाले यांच्या हस्ते ई-लर्निंग या प्रकल्पाचे मोठ्या उत्साहात शेकडो विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. मनपा आयुक्त अरुण डोंगरे यांच्या संकल्पनेतून मनपाच्या शाळांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर रोटरी क्लब आॅफ अमरावतीच्या मदतीने सुरु करण्यात येत आहे. वडाळी हा गरीब परिसर असून येथील मुलांमध्य गुणवत्ता वाढली असून त्यांना कम्प्युटरचे ज्ञान व्हावे व आनंददायी शिक्षण मिळावे या हेतुने या शाळेत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त अरुण डोंगरे, स्थायी समिती सभापती मिलींद बांबल, शिक्षण सभापती हमीदाबी, वार्डाचे नगरसेवक विजय बांभुळकर, सपनाताई ठाकूर, सुजाता झाडे, नुतन भुजाडे, उपायुक्त रमेश मवासी, शिक्षणाधिकारी सविता चक्रपाणी, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान इयत्ता २ रीची रसिका लोखंडे या चिमुकलीने मराठीमध्ये तर साक्षी गरुड हिने इंग्रजीमध्ये अस्थिलपतपणे भाषण देवून सर्वांना चक्क केले. तर ७ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकलेली या शाळेतील पूर्वा गायकवाड हिचा महापौर, आयुक्त, सभापती यांनी सत्कार केला. उद्घाटनानंतर या प्रकल्पाव्दारे अध्यापन कसे केले जाईल याचे प्रात्यक्षिक पाहुण्यांना सादर करण्यात आले. या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांच्या सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, आकशगंगा, शरीराचे अवयव व कार्य, विज्ञानातील प्रयोग, दिव-रात्र अशा कठीण संकल्पना लवकरच स्पष्ट होण्यास निश्चितच मदत होणार असून संगणकीय ज्ञानाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल. उपस्थित पाहुण्यांनी भाषणादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक योगेश पखाले व शिक्षकांचे अभिनंदन केले तर हा प्रकल्प यशस्वी व्हावा याकरिता शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन गोपाल अभ्यंकर तर आभार प्रदर्शन योगेश राणे यांनी केले. (प्रतिनिधी)