वादळी पावसामुळे लाखोंची हानी

By Admin | Updated: June 12, 2014 23:39 IST2014-06-12T23:39:34+5:302014-06-12T23:39:34+5:30

परिसरात बुधवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान झालेल्या वादळी पावसामुळे लाखोंची हानी झाली. वादळाच्या तीव्रतेमुळे अनेक घरांवरची छत, टीन आणि कवेलू उडाले. विद्युत खांब आणि झाडे उन्मळून पडली.

Lack of millions due to windy rain | वादळी पावसामुळे लाखोंची हानी

वादळी पावसामुळे लाखोंची हानी

 पुसला : परिसरात बुधवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान झालेल्या वादळी पावसामुळे लाखोंची हानी झाली. वादळाच्या तीव्रतेमुळे अनेक घरांवरची छत, टीन आणि कवेलू उडाले. विद्युत खांब आणि झाडे उन्मळून पडली. यामध्ये ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कित्येक कुटुंब बेघर झाले. परिसरातील वीजपुरवठा २४ तासांपासून खंडित असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
बुधवारी (११ जून) रात्री ८ वाजताच्या दरम्यान अचानक वादळी पाऊस झाला. वादळाची तीव्रता अधिक असल्याने पुसला गावातील झाडे, विद्युत खांब उन्मळून पडले तर विद्युत तारा तुटल्या. टेलिफोनचे खांबही पडले. यामुळे विद्युत पुरवठा, दूरध्वनी सेवा रात्रभर खंडित होती. पुसला येथील अनेकांच्या घराचे छत टीना आणि कवेलू उडाले. प्रभात हायस्कूलच्या वर्गखोल्यांचे टीन दूरवर उडाले. वृक्ष उन्मळून पडल्याने अनेक घरांची मोडतोड झाली. डॉ.बाबासहोब आंबेडकर सभागृहाची सुरक्षा भिंत आणि स्लॅबवर झाड कोसळल्याने सभागृहाचे मोठे नुकसान झाले. विद्युत खांब वाकल्याने तारा तुटल्या. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पुसलावासीयांना अख्खी रात्र काळोखात काढावी लागली. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागला. पशुही सैरभैर झाले होते. झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण तहसीलदार राम लंके यांनी तलाठ्यांमार्फत केले असून तसा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. नुकसानग्रस्तांना शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Lack of millions due to windy rain