शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने ग्राहक त्रस्त

By admin | Updated: October 27, 2015 00:21 IST

मेळघाटात धार्मिक उत्सवादरम्यान वीज कंपनीने शहरात सहा तास तर ग्रामीण भागात दहा तासांचे अघोषित भारनियमन सुरू केले.

भारनियमनाचा वैताग : शासकीय कार्यालयातील कामकाज प्रभावितधारणी : मेळघाटात धार्मिक उत्सवादरम्यान वीज कंपनीने शहरात सहा तास तर ग्रामीण भागात दहा तासांचे अघोषित भारनियमन सुरू केले. सोबतच उर्वरित वेळेतही अत्यंत कमी दाबाचा वीज पुरवठ्याचा तडकाही लावत असल्यामुळे शासकीय कार्यालयातील संगणक व इतर कामे ठप्प झाली आहेत. तालुक्यातील शेतकरीही त्रस्त झाल्याने वीज वितरण विभागाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नवरात्री, विजयादशमीसह मोहर्रम, दिवाळी असे महत्वाचे वार्षिक धार्मिक सण, उत्सव लागोपाठ साजरे झाले. मात्र धारणी येथील वीज वितरण विभागाकडून भारनियमन व कमी विद्युत दाबाची अधिकृत सूचना वेळापत्रक जाहीर न करताच गेल्या एक महिन्यापासून धारणी शहरात सहा तासाचे भारनियमन आणि तालुक्यातील ग्रामीण विभागात दहा तासापेक्षाही जास्तीचे अघोषित भारनियमन सुरू केले. त्यामध्ये अधिकचा तडका म्हणून उर्वरित वेळेत सुद्धा कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने तब्बल २० तास भारनियमन असल्यासारखे नागरिक अनुभव घेत आहे. यामुळे शासकीय कार्यालयाचे संगणक संच, बँकेचे व्यवहार, आॅनलाईन फॉर्म, सातबारा, ई प्रक्रिया शेतातील विद्युत मोटरपंप पूर्णपणे निकामी झाले आहे. यावर्षी पाऊस कमी आल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र रब्बी पिकांच्या वेळेतही भारनियमासह कमी दाबाचा वीज पुरवठा असल्यामुळे रबी पिकेही धोक्यात आली आहेत. सध्या हिवाळ्यात कडक ऊन असल्याने तालुक्यातील कित्येक शेतकऱ्यांनी हरभरा, गव्हाची पेरणीसुद्धा केलेली नाही. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे त्यांना विद्युत विभागाने त्रस्त करून सोडले असून पूर्ण विद्युत मोटरपंप निकामी झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)