खेडचे आरोग्य केंद्र बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:12 IST2017-08-13T23:11:04+5:302017-08-13T23:12:11+5:30

उघड्यावर पडलेला लाखोंचा औषधी साठा, बेवारस लॅपटॉप, संगणक, ना डॉक्टरांचा पत्ता, ना परिचारिकांचा,......

Khed's health center is unavoidable | खेडचे आरोग्य केंद्र बेवारस

खेडचे आरोग्य केंद्र बेवारस

ठळक मुद्देशिक्षण सभापतींची आकस्मिक भेट : संगणकासह लाखोंची औषधी वाºयावर

अमरावती : उघड्यावर पडलेला लाखोंचा औषधी साठा, बेवारस लॅपटॉप, संगणक, ना डॉक्टरांचा पत्ता, ना परिचारिकांचा, ना आरोग्य सहायक उपस्थित, ना सुपरवायजर हजर. कोणीही आत शिरावे आणि हात साफ करून निघून जावे, अशी स्थिती. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम सभापती जयंत देशमुख यांनी मोर्शी तालुक्यातील खेड येथील आरोग्य केंद्राला दिलेल्या भेटीत हे विदारक वास्तव उघड झाले.
मोर्शी तालुक्याच्या दौºयावर आलेले शिक्षण व बांधकाम सभापती जयंत देशमुख यांनी सहज म्हणून नजीकच्या खेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट दिली.
आरोग्य कर्मचाºयांवर अंकुश कुणाचा?
यावेळी आरोग्य केंद्राचे प्रवेशद्वार सताड उघडे होते. आरोग्य केंद्राशेजारी राहणाºया एका इसमाला पीएचसीसमोर गाडी थांबल्याचे दिसून येताच त्याने धावत येऊन पीएचसीचे गेट उघडले आणि जयंत देशमुखांना आत नेले. सदर इसमाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य केंद्रात दररोज अशीच स्थिती असते. डॉक्टर व इतर कर्मचारी ८.३० वाजता येऊन सायंकाळी ५ वाजता निघून जातात. त्यानंतर येथे रूग्णांची तपासणी करण्यास कोणीही उपस्थित नसते, अशी माहिती सदर इसमाने पुरविली. शिक्षण व बांधकाम सभापतींनी या आरोग्य केंद्राचा फेरफटका मारला असता आत एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य सेविका, आरोग्य सहायक, महिला आरोग्य सेविका, परिचर यापैकी कोणीही या आरोग्य केंद्रात दिसून आले नाही. आरोग्य केंद्राची दारे सताड उघडी टाकून सर्वजण निघून गेले होते. अशा स्थितीत गावाबाहेर असलेल्या या पीएचसीत असामाजिक तत्त्वाने शिरकाव करून हात साफ केल्यास आश्चर्य वाटू नये.
ग्रामीण भागातील नागरिकांना सहजरीत्या आरोग्यविषय सोयी उपलब्ध व्हाव्यात, या हेतुने शासनाने लाखोंचा खर्च करून आरोग्य केंद्राची इमारत बांधली. येथे सर्व आवश्यक सुविधा पुरविल्या. कर्मचाºयांच्या वेतनावरही लाखोंचा खर्च होतो. मात्र, येथे डॉक्टर व कर्मचारी नियमित उपस्थित राहात नसल्याने येथे उपचारासाठी येणाºया रूग्णांवर प्रथमोपचारदेखील क्वचितच होतात आणि त्यांना थेट मोर्शीला जाण्याचा सल्ला दिला जातो. कोट्यवधींचा खर्च करून उभारलेल्या या डोलाºयाच्या रूग्णांना काही उपयोगच नसेल तर हा अवाढव्य खर्च कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होतोय.
लाखोंची औषधी, संगणक वाºयावर
जि.प.बांधकाम व शिक्षण सभापतींच्या भेटीदरम्यान या आरोग्य केंद्रात कोणीही आढळून आले नाही. दारे मात्र सताड उघडी होती. संगणक, लॅपटॉपसह लाखोंचा औषधी साठा, पलंग, गाद्या व इतर साहित्य बेवारस पडून होते. परिसराची स्वच्छता बरेच दिवसांत झाली नसावी, असे चित्र तेथे पसरलेल्या घाण-कचºयावरून दिसून येत होते. एक डॉक्टर, अटेंडन्ट आणि आणि परिचारिका आरोग्य केंद्रात नेहमी उपस्थित असावी, असा नियम असतानासुद्धा या आरोग्य केंद्रात कोणीही आढळून आले नाही.
चौदाही कर्मचारी अनुपस्थित
ग्रामीण भागातील रूग्णांना चोवीस तास आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहेत. एका पीएचसीमध्ये दोन आरोग्य अधिकारी, १ सुपरवायजर, दोन आरोग्य सहायक, एक महिला आरोग्यसेविका, चार परिचरांसह एकूण १४ कर्मचाºयांचा स्टाफ नियुक्त करण्यात आला आहे. मात्र, या कर्मचाºयांवर कोणाचाच अंकुश नाही. त्यामुळे रूग्णांचे हाल होतात. खेडच्या आरोग्य केंद्रातील १४ कर्मचाºयांपैकी एकही सभापतींच्या भेटीच्या वेळी तेथे उपस्थित नव्हता.

खेडच्या पीएचसीला आकस्मिक भेट दिली. तेथे एकही कर्मचारी उपस्थित नव्हता.साहित्य बेवारस पडून होते. हा प्रकार अतिशय गंभीर असून जबाबदार कर्मचाºयांवर निलंबनाची कारवाई केली जाईल.
-जयंत देशमुख, सभापती, जि.प.बांधकाम विभाग

Web Title: Khed's health center is unavoidable