शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

८३ हजार शेतकऱ्यांचा खरीप पीक विमा

By admin | Updated: September 23, 2015 00:29 IST

नैसर्गिक आपत्तीपासून शेती पिकांना संरक्षण मिळावे, यासाठी खरीप हंगामासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्यात आली.

८० हजार हेक्टरला संरक्षण : शेतकऱ्यांनी भरले साडेतीन कोटीची रक्कमअमरावती : नैसर्गिक आपत्तीपासून शेती पिकांना संरक्षण मिळावे, यासाठी खरीप हंगामासाठी राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना राबविण्यात आली. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांव्यतिरिक्त जिल्हा सहकारी बँकेत ८२ हजार ९१५ शेतकऱ्यांनी ७९ हजार ७११ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी ३ कोटी ५६ लाख ६३ हजार ७०४ रूपये रकमेचा भरणा केला आहे. शासनाने ३ कोटी ३९ लाख ३ हजार ६०० रुपयांचे अनुदान दिले आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेंतर्गत पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसान भरपाई वैयक्तिक स्तरावर निश्चित करण्यासाठी राज्यातील सर्व अधिसूचित पिकासाठी खरीप २०१५ हंगामात अधिसूचित पिकासाठी पीक विमा लागू करण्यात आला आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान हे भारतीय कृषी विमा कंपनीकडून वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत सहभाग घेतला आहे, त्या संबंधित वित्तीय कंपनीस किंवा भारतीय कृषी विमा कंपनीस कोणत्याही परिस्थितीत नुकसान झाल्यापासून ४८ तासांत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकाची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. त्यानंतर भारतीय कृषी विमा कंपनीने जिल्हा महसूल तसेच कृषी विभागाच्या मदतीने नुकसान भरपाईचे प्रमाण निश्चित करण्यास येणार आहे या योजनेची अंतिम तारीख ३० जून २०१५ ही होती त्यानंतर शासनाने योजनेला ८ दिवसांची मुदतवाढ दिलेली होती. या योजनेत जिल्ह्यातील ४५ हजार ७६३ शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेत ५० हजार ७५० हेक्टर सोयाबीन क्षेत्रासाठी विमा काढला आहे. विम्याची संरक्षित रक्कम ९२ कोटी ७ लाख ३१ हजार ४०५ रूपये एवढी आहे. १५ हजार ४६८ शेतकऱ्यांनी तूर, ७ हजार ३५६ शेतकऱ्यांनी कापूस, १ हजार १४८ शेतकऱ्यांनी ज्वारी, ११ हजार ९८३ शेतकऱ्यांनी मूग, ११४ शेतकऱ्यांनी भात, २५ शेतकऱ्यांनी तीळ व १ हजार ५६ शेतकऱ्यांनी उडीद पिकासाठी विमा काढलेला आहे. (प्रतिनिधी)