शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भातकुली तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाची मुहूर्तमेढ

By admin | Updated: May 24, 2015 00:28 IST

राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची मुहूर्तमेढ भातकुली तालुक्यातील विविध गावांमध्ये रोवल्या गेली आहे.

दोन कोटी रुपये खर्च : जिल्हाधिकारी गीत्ते, रवी राणा यांनी केली पाहणीअमरावती : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची मुहूर्तमेढ भातकुली तालुक्यातील विविध गावांमध्ये रोवल्या गेली आहे. सुमारे दोन कोटी रुपये त्याकरिता खर्च होणार असून शुक्रवारी जिल्हाधिकारी किरण गीत्ते, आ. रवी राणा यांनी गावागावांत जाऊन प्रत्यक्ष कामांची पाहणी केली.भातकुली तालुक्यातील हरताळा, सायत, भातकुली, खालखोणी, इंदापूर, आसरा, कुमागड, चेचरवाडी आदी गावांमध्ये तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, शेततळे, खोदतळे आदी कामे युद्धस्तरावर सुरु आहेत. ही कामे व्यवस्थितपणे सुरु आहेत की नाही, हे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी गीत्ते, आ. राणा यांनी ४६.७ अंश सेल्सियस तापमानातही गावागावातून जाऊन जलयुक्त शिवार अभियानाची कामे बघितली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अनिल खर्चान, उपविभागीय अधिकारी जगताप, तालुका कृषी अधिकारी म्हस्के, नायब तहसीलदार बागडे आदी उपस्थित होते. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना या अभियानामुळे भुजलस्तर वाढणार यात दुमत नाही. येत्या काळात शेतकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावे लागणार नाही. पाणी टंचाईतूनही मुक्ती मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. परंतु गावात जिल्हाधिकारी, आमदार येवून गावकऱ्यांशी संवाद साधत समस्या, प्रश्न जाणून घेत असल्याचा आनंद ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर बघावयास मिळाला. कामांची पाहणी करताना पंचायत समिती सदस्य संगीता चुनकीकर, सरपंच अनिल वर्धे, उपसरपंच दीपक मानकर, सतीश चक्रे, विनोद कुटेमाटे, शेख रहेमान, शे. करीम, मीेना मानकर, पल्लवी केरटे, ममता कावरे, जगदेव मानकर, नारायण मानकर, जगदीश काळे, राजू चुनकिकर, भाष्कर पाचकवडे, गणेश पाचकवडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला झुणका-भाकरीचा आस्वादजलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु असलेल्या विविध गावांतील कामांची पाहणी करताना जिल्हाधिकारी किरण गीत्ते, आ. रवी राणा यांनी चक्क आमराईत बसून झुनका भाकरीचा आस्वाद घेतला. ग्रामस्थांशी संवाद साधून पेरणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली.