शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

जैनांचे सिद्धक्षेत्र मुक्तागिरी ‘लॉकडाऊ न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

मॅनेजिंग ट्रस्टींनी लॉकडाऊ नच्या अनुषंगाने जैनधर्मीय भाविकांना पूर्वकल्पना दिल्यामुळे मुक्तागीरीत कुठलाही भाविक अडकलेला नाही. महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवरील मुक्तागिरी हे अतिप्राचीन सिद्धक्षेत्र दक्षिण भारताचे शिखरजी म्हणून ओळखले जाते. मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील भैसदेही तालुक्यातील हे अतिप्राचीन सिद्धक्षेत्र पहिल्यांदा लॉकडाऊ न झाले आहे.

ठळक मुद्देराज्य सीमा सील : सेवाधारींचे वास्तव्य, भाविकांकरिता खोल्या, हॉल ओस

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : श्री दिगंबर जैन सिधक्षेत्र मुक्तागिरी कोरोनाच्या अनुषंगाने पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्य सीमा सील करण्यात आल्या आहेत. या संकटामुळे राज्यासह राज्याबाहेरून येऊ घातलेल्या दोनशे ते अडीचशे जैनधर्मीय भाविकांनी महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर या सिद्धक्षेत्राला भेट देण्यासाठी प्रवास रद्द केला.मॅनेजिंग ट्रस्टींनी लॉकडाऊ नच्या अनुषंगाने जैनधर्मीय भाविकांना पूर्वकल्पना दिल्यामुळे मुक्तागीरीत कुठलाही भाविक अडकलेला नाही. महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवरील मुक्तागिरी हे अतिप्राचीन सिद्धक्षेत्र दक्षिण भारताचे शिखरजी म्हणून ओळखले जाते. मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील भैसदेही तालुक्यातील हे अतिप्राचीन सिद्धक्षेत्र पहिल्यांदा लॉकडाऊ न झाले आहे. हे सिद्धक्षेत्र परवाड्यापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी नेहमीच जैनधर्मीय भाविकांची वर्दळ राहते. दूरदुरू न येणारे भाविक या ठिकाणी मुकामाला असतात. लॉकडाऊ नच्या अनुषंगाने सर्व खोल्या, हॉल ओस पडल्या आहेत. सर्वत्र शांतता असून, हे सिद्ध क्षेत्र जणू मानविरहित झाल्यागत बघायला मिळत आहे. या सिद्धक्षेत्री कार्यरत सेवाधारी कर्मचारी तेवढे त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. ते सोशल डिस्टन्सिंग पाळत जबाबदारी सांभाळून आहेत. परतवाडा-खरपी-धापोडा-मुक्तागिरी या मार्गावरील मध्यप्रदेशातील धापोडा गावाजवळ सीमा सील करण्यात आली आहे. मुक्तागिरीकडे जाण्याची प्रशासनाकडून कुणालाही अनुमाती नाही. यामुळे सेवेकऱ्यांचा परतवाडा शहराशी संपर्क थांबला आहे.कोरोनाच्या अनुषंगाने बैतुल जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त निर्देशांचे पालन या ठिकाणी केले जात आहे.मुक्तागिरीला पूर्णपणे लॉकडाऊन आहे. बैतुल जिल्हाधिकाऱ्यांसह स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन केले जात आहे. स्थानिक निवासी सेवाधिकारी कर्मचाºयांव्यतिरिक्त कुणीही त्या ठिकाणी मुक्कामी नाही. कुणासही अनुमती नाही.- अतुल कळमकरमॅनेजिंग ट्रस्टी

टॅग्स :Socialसामाजिक