शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
7
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
8
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
10
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
11
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
12
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
13
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
14
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
15
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
16
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
17
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
18
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
19
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
20
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

जबलपूर एक्स्प्रेस सुरु

By admin | Updated: June 30, 2015 00:33 IST

मागील काही दिवसांपासून तांत्रिक कारणांमुळे बंद करण्यात आलेली अमरावती- जबलपूर एक्स्प्रेस सोमवारपासून पूर्ववत सुरु करण्यात आली आहे.

सोमवारपासून धावली : मध्य प्रदेशात ये-जा करणाऱ्यांची गैरसोय दूरअमरावती : मागील काही दिवसांपासून तांत्रिक कारणांमुळे बंद करण्यात आलेली अमरावती- जबलपूर एक्स्प्रेस सोमवारपासून पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात ये- जा करणाऱ्या प्रवाशांना होत असलेली गैरसोय दूर झाली आहे. बंद नंतर पहिल्यांदाच सोमवारी ही गाडी सुरु झाली असली तरी प्रवाशांची गर्दी नगण्य असल्याचे दिसून आले.जबलपूर एक्स्प्रेस ही गाडी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वे भुसावळ विभागाने घेताच प्रवाशांना ही बाब धक्का देणारी होती. पंरतु इटारसी येथील संगणकीकृत सिग्नल प्रणाली अचानक जळून खाक झाल्यामुळे सिग्नल प्रणाली पूर्णत: निकामी झाली. परिणामी इटारसीमार्गे जाणाऱ्या बहुतांश गाड्या बंद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा फटका जबलूर एक्स्प्रेस रद्द करण्याला बसला. रेल्वेने जबलपूर एक्स्प्रेस ३० जूनपासून नियमित करण्याचे ठरविले होते. मात्र ही गाडी २९ जूनपासून नियमित सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी ही गाडी वेळेनुसार जबलपूरकडे रवाना झाली. उद्या मंगळवारी ही जबलपूर एक्स्प्रेस सुटणार नसून १ जुलैपासून ही गाडी नियमित सुरु होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. (प्रतिनिधी)तांत्रिक अडचणी दूर होताच प्रवाशांना सेवा इटारसी येथील संगणकीकृत सिग्नल प्रणाली जळून खाक झाल्यामुळे रेल्वे अनेक महत्त्वपूर्ण आणि लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याचा प्रसंग प्रशासनावर ओढावला. १५ दिवसांपासून अमरावती- जबलपूर एक्सप्रेस ही गाडी बंद होती. परंतु तांत्रिक अडचणी दूर होताच काही रेल्वे गाड्या सुरु करण्याचा निर्णय रेल्वने घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून जबलपूर एक्स्प्रेस सुरु करण्यात आली आहे. नागपूरमार्गे मध्य प्रदेशकडे जाणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी असल्याने या गाडीचा लाभ होईल.