शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न कायम

By admin | Updated: July 30, 2014 23:48 IST

महापालिका शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांनी नियमित वेतन मिळावे, ही मागणी अनेक महिन्यांपासून रेटून धरली आहे. सोमवारी शिक्षकांच्या संघटनांनी आयुक्तांची भेट घेऊन वेतन नियमित मिळत नसल्याने

अमरावती: महापालिका शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांनी नियमित वेतन मिळावे, ही मागणी अनेक महिन्यांपासून रेटून धरली आहे. सोमवारी शिक्षकांच्या संघटनांनी आयुक्तांची भेट घेऊन वेतन नियमित मिळत नसल्याने निर्माण होणाऱ्या समस्या आणि व्यथा मांडल्या. मात्र महापालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्याने शिक्षकांची ही न्यायिक मागणी पूर्ण करण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व अखिल भारतीय प्राथमिक संघाच्या नेतृत्वात शिक्षकांनी आयुक्त अरुण डोंगरे यांची भेट घेतली. यावेळी शिक्षकांनी प्रशासनाकडून मिळणाऱ्या असहकार्याचा पाढा वाचला. राज्य शासन आणि महापालिका प्रशासन असे संयुक्तपणे ५० टक्के तत्त्वावर शिक्षकांचे वेतन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र आॅनलाईन वेतन प्रणाली सुरु करण्याचा शासनाने निर्णय घेतला असताना या निर्णय प्रक्रियेची कार्यवाही व्यवस्थितरित्या करण्यात आली नसल्याने शिक्षकांना शासनाकडून वेतनाची रक्कम प्राप्त होत नसल्याचा आरोप शिक्षकांनी केला. यावेळी आयुक्तांनी शिक्षकांच्या व्यथा जाणून घेतल्या. आर्थिक परिस्थिती सुरळित झाल्यानंतर शिक्षकांचे नियमित वेतन देण्याची हमी त्यांनी घेतली. वेतनाव्यतिरिक्त शिक्षकांनी काही समस्या मांडण्याचा प्रयत्न केला असता या विषयावर स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी शिक्षकांना आश्वासित केले. यावेळी उपायुक्त विनायक औगड, रमेश मवासी, शिक्षणाधिकारी सविता चक्रपाणी, प्रभारी लेखापरिक्षक राहुल ओगले, लेखापाल शैलेंद्र गोसावी, ताजी, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर आदी उपस्थित होते.शिक्षकांच्या व्यथा मांडतावेळी योगेश पखाले, सीमा ठाकू र, वनितव सावरकर, गोपाल कांबळे, चेतना बोंडे, संध्या वासनिक, गोपाल अभ्यंकर, सुधीर धोत्रे, कविता कांबळे, मीनल ठाकरे, निलीमा लव्हाळे, प्रतिभा कोळवते, रवी हरणे, सुरेखा पेंदाम, रुपाली तळेगावकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)