शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांद्वारा आयसोलेशन, विलासनगर केंद्राची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:30 IST

अमरावती : महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी आयसोलेशन दवाखाना दसरा मैदान व विलासनगर शाळा क्र.१७ या आरटी-पीसीआर ...

अमरावती : महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी आयसोलेशन दवाखाना दसरा मैदान व विलासनगर शाळा क्र.१७ या आरटी-पीसीआर व अँटीजेन टेस्‍ट सेंटरची पाहणी केली. येथे येणाऱ्या व्‍यक्‍तींना सुविधा उपलब्‍ध झाली पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली. या सेंटरमुळे नमुने तपासणीची प्रक्रिया गतिमान झाल्याचे ते म्हणाले.

विलासनगरातील शाळेची पा‍हणी आयुक्तांनी केली. सेंटरला आवश्‍यक असणाऱ्या सर्व बाबी तेथे उपलब्‍ध करून देण्‍यात आल्या आहे. अँटिजेन चाचणीमुळे १५ ते २० मिनिटांत निदान केले जाते तसेच चाचणी नकारात्‍मक असल्‍यास आररटीपीसीआर करणे महत्त्वाचे आहे. पॉझिटिव्‍ह अहवाल लवकर मिळाल्‍यामुळे संबंधित रुग्‍णाला त्वारेने वैद्यकीय उपचार मिळत आहे. या सेंटरवर येणाऱ्या बाधित व्‍यक्‍तींना योग्‍य अशी सुविधा उपलब्‍ध करून देण्यात आल्याचे आयुक्त म्हणाले.

महापालिका कार्यक्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्णांचे रहिवासी विभागात तयार केलेल्‍या कंटेन्‍मेंट झोन किंवा हॉटस्‍पॉट क्षेत्रात शहरी आरोग्‍य केंद्रामार्फत घरोघरी करण्‍यात येणाऱ्या दैनंदिन सर्वेक्षणांतर्गत आढळून येणारे एस.ए.आर.आय./आय.एल.आय. रुग्‍ण आढळून आल्‍यास त्‍यांची कोरोना चाचणी करणे अपेक्षित आहे. ज्‍या रुग्‍णांची रॅपिड अँटीजेन टेस्‍ट पॉझिटिव्‍ह येईल, त्‍या व्‍यक्‍तीला असलेल्‍या लक्षणांनुसार कोरोना केअर सेंटर, कोरोना हेल्‍थ सेंटर कोव्‍हीड हॉस्‍पिटलमध्‍ये संदर्भीय करण्‍यात येईल.

बॉक्स

नियमांचे पालन करा, नागरिकांना सुचना

ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्‍वसनाचा त्रास असल्‍यास, वृध्‍द व दिव्‍यांग व्‍यक्‍तींना काही त्रास असल्‍यास, कोणतेही व्‍यक्‍ती कोव्‍हीड-१९ च्‍या रुग्‍णांच्‍या संपर्कात आलेल्‍या नागरिकांची माहिती शहरी आरोग्‍य केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यानी द्यावी व नागरिकांना घरीच राहण्‍याचा सल्‍ला देत सुरक्षित राहावे तसेच परिसरातील नागरिकांनी सोशल डिस्‍टंसिंगचे पालन कराण्याच्या सुचना आयुक्तांनी दिल्या.